उजनी sakal
सोलापूर

सोलापूर : उजनीतून शहरासाठी गुरुवारपासून सुटणार पाणी

पालकमंत्री भरणे यांची मान्यता; औज बंधाऱ्यात सध्या केवळ आठ फूट साठा

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यात सध्या आठ फुटांपर्यंतच पाणी आहे. पाऊस लांबणीवर पडल्याने बंधाऱ्यातील पाण्याने तळ गाठला आहे. शहराचा पाणीपुरवठा अजूनही विस्कळितच असून दररोज बंधाऱ्यातील अर्धा फूट पाणी कमी होऊ लागले आहे. उजनीतून शहरासाठी पाणी सोडण्यास आज पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मान्यता दिली. त्यामुळे दोन दिवसांनी धरणातून औज बंधाऱ्यात पाणी सोडले जाणार आहे.

उजनी धरण सध्या मायनस तीन टीएमसीपर्यंत खाली गेले आहे. ७ जूनपासून चांगला पाऊस होईल, अशी आशा असतानाही अजूनही धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला नाही. दुसरीकडे सोलापूर शहरातही मोठा पाऊस झाला नसल्याने पुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यानेही तळ गाठला आहे. आता आठ-दहा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा औज बंधाऱ्यात आहे. बंधाऱ्यातील पाणीसाठा दररोज अर्ध्या टक्क्यांनी कमी होत आहे. धरणातून पाणी औज बंधाऱ्यात यायला किमान आठ-दहा दिवस लागतात. त्यामुळे पुढील दोन दिवसांत चांगला पाऊस न झाल्यास गुरुवारी (ता. १६) धरणातून पाणी सोडले जाणार आहे. पण, पाऊस लांबल्याने धरण मायनसमध्ये गेल्याने आणि शहराला पावसाळ्यात भीमा नदीतून पाणी सोडण्यास कालवा सल्लागार समितीची मान्यता नसल्याने त्यासंबंधीचा प्रस्ताव जलसंपदा अधिकाऱ्यांनी पालकमंत्री भरणे यांच्याकडे पाठविला होता. त्याला पालकमंत्र्यांनी तातडीने मान्यता दिली असून आता शहराला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

समांतर जलवाहिनी होणार कधी?

सोलापूर ते उजनी ११० किलोमीटरची पाईलपाईन दीड-दोन वर्षांत होईल, अशा बाता सत्ताधाऱ्यांनी अनेकदा केल्या. त्यानंतर त्याचे खापर अधिकाऱ्यांवर फोडले. पाच वर्षांपूर्वी निवडणुकीत विरोधकांसह सत्ताधारी भाजपनेही शहरवासियांना एक दिवसाआड किंवा दररोज पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. समांतर जलवाहिनीच्या माध्यमातून तो प्रश्न सुटेल, असा सोलापूकरांना विश्वास होता. पण, अजूनही समांतर जलवाहिनी रखडलेलीच आहे. त्यामुळे शहराला चार ते सहा दिवसाआड पाणी मिळत असल्याची स्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aadhaar Card: आधार कार्ड कुठे आणि कशासाठी वापरले ते कळणार; नवीन अॅपमुळे काम सोप होणार, प्रक्रिया काय?

Ichalkaranji Muncipal : इचलकरंजीत भाजपची कसोटी; नवे-जुने संघर्षामुळे निवडणूक रंगात

पोरींनो या क्षेत्रात येऊ नका... गौतमी पाटीलचा तरुण मुलींना सल्ला; म्हणाली, 'मला सिद्धार्थ जाधवने सांगितलेलं की...

Night Milk Benefits: हिवाळ्यातील आरोग्याचं गुपित! हिवाळ्यात रात्री दूधात साखरे ऐवजी गुळ मिसळून प्यायल्याने दूर होतात 'या' 4 समस्या

Latest Marathi News Live Update : मुंबई नागपूर हायवेवर भिषण अपघात, तिघे जागीच ठार, दोन जण गंभीर..

SCROLL FOR NEXT