bribe 
सोलापूर

"लाचलुचपत'चे सोलापूर युनिट पुणे विभागात दुसऱ्या क्रमांकावर ! वर्षात 23 सापळे, 29 आरोपींना अटक 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने यंदाच्या वर्षी दुसऱ्याच व्यक्‍तीच्या बॅंक खात्याचा नंबर देऊन त्यामध्ये ऑनलाइन पैसे वर्ग करण्यास लावून भ्रष्टाचार करणाऱ्यास अटक करून गुन्हा दाखल केला. चालू वर्षी सोलापूर युनिटने 23 सापळा कारवाईत 29 आरोपींना अटक करून अन्य भ्रष्टाचाराचेही 2 गुन्हे दाखल करून 5 आरोपींना अटक केली आहे. चालू वर्षी सोलापूर विभागाची कारवाई ही पुणे विभागात दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

सोलापूर युनिटकडून वेगवेगळ्या विभागात करण्यात आलेली कारवाई पुढीलप्रमाणे (कंसात कारवाई व आरोपी संख्या) :
जलसंधारण उपविभाग (1 कारवाई, 1 आरोपी), महानगरपालिका (1 कारवाई, 1 आरोपी), खासगी इसम (2 कारवाई, 5 आरोपी), भूमी अभिलेख विभाग (3 कारवाई, 3 आरोपी), पोलिस (3 कारवाई, 3 आरोपी), महसूल (4 कारवाई, 5 आरोपी), ग्रंथालय (1 कारवाई, 1 आरोपी), कृषी (1 कारवाई, 1 आरोपी), म. रा. वि. वि. क. मर्या. (3 कारवाई, 3 आरोपी), आयटीआय (1 कारवाई, 1 आरोपी), जिल्हा परिषद आरोग्य विभाग (1 कारवाई, 2 आरोपी), महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था (1 कारवाई, 1 आरोपी), पंचायत समिती (1 कारवाई, 1 आरोपी), अन्य भ्रष्टाचार (2 कारवाई, 5 आरोपी). 

भ्रष्टाचारमुक्‍त प्रशासन देण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतात. परंतु, काही लोकसेवकांकडून शासनाच्या प्रयत्नांना खो घालून भ्रष्टाचार करण्यात येतो. त्यामुळे शासनाला भ्रष्टाचार विरोधी अभियान चालवावे लागते. या अभियानातही नागरिकांचा सहभाग फारच कमी असतो. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी कोरोना लॉकडाउनमुळे कमी सापळा कारवाई झाली आहे. 

भ्रष्टाचार मुक्‍तीसाठी नागरिकांनी जास्तीत जास्त तक्रारी कराव्यात म्हणून लाचलुचत प्रतिबंधक विभागाकडून 1064 हा टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आलेला आहे. नागरिकांनी केवळ भ्रष्टाचार वाढला आहे म्हणून केवळ गप्पा न मारता भ्रष्टाचारी लोकसेवकांवर कारवाई होण्यासाठी टोल फ्री क्रमांकावर तक्रारी करणे गरजेचे आहे. 
- संजीव पाटील, 
उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT