solapur unseasonal rain update fruit farm and onion crop damage  Sakal
सोलापूर

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस; सखल भागात साचले पाणी; आंबा, भुईमूग कांद्याला फटका

मंगळवारी ३९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पण, दुपारी पावणे पाचनंतर सायंकाळी साडेसहापर्यंत विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह सोलापूर शहरात दमदार पाऊस

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात मंगळवारी (ता. १४) सायंकाळी विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. शहरात दोन ठिकाणी झाड पडले. सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. ग्रामीण भागातही पावसाने सर्वदूर हजेरी लावली. या पावसामुळे आंबा, डाळिंब, काढणीला आलेला कांदा व भुईमूग अशा पिकांना फटका बसला आहे.

मंगळवारी ३९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पण, दुपारी पावणे पाचनंतर सायंकाळी साडेसहापर्यंत विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह सोलापूर शहरात दमदार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे चाकरमान्यांची चांगलीच धावपळ उडाली. तसेच सोलापूर शहरातील विविध ठिकाणी सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

एसटी स्टँड परिसर, रंगभवन चौक, निराळी वस्ती रोड, सम्राट चौक येथील सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांसह दुचाकीस्वारांची पंचाईत झाली. दुसरीकडे डफरीन हॉस्पिटलच्या संरक्षक भिंतीवर मोठ्या झाडाची फांदी तुटून पडली. यामुळे काही वेळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.

१५ मिलिमीटर पावसाची नोंद

अवकाळी पावसामुळे पाडाला आलेला आंबा, काढणीला आलेला भुईमूग, उन्हाळी कांद्याला फटका बसला आहे. अंदाजे १५ मिलिमीटरपर्यंत पाऊस पडला असावा असा कृषी विभागाचा अंदाज आहे. या अवकाळी पावसाचा दणका डाळिंब पिकाला थेट बसत नाही, पण यामुळे रोगराई वाढू शकते. दरम्यान, मंगळवारी (ता. १४) जिल्ह्यात दिवसभर उन्हाची तीव्रता देखील होती. मंगळवारी सोलापूर जिल्ह्यात ३९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

Ratnagiri : देव तारी त्याला कोण मारी! पुण्यातील पर्यटक समुद्रात वाहून जात होता..., स्थानिकांनी प्रसंगावधानामुळे वाचला; थरारक क्षण

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT