solapur  sakal
सोलापूर

Solapur : "युटोपियनचे 7.51लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट" - अध्यक्ष परिचारक

मागील गळीत हंगामात गाळप झालेल्या ऊसास प्रती टन 200 ऊस दर देताना कामगारांना 12.5 टक्के दिवाळी बोनस

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : एफआरपी पेक्षा जास्तीचा दर देण्याची परंपरा ठेवणाय्रा युटोपियन शुगर्स लि. या कारखान्याला मागील गळीत हंगामात गाळप झालेल्या ऊसास प्रती टन 200 ऊस दर देताना कामगारांना 12.5 टक्के दिवाळी बोनस देण्याची घोषण अध्यक्ष उमेश परिचारक यांनी केली.

कारखान्याच्या चालू गळीत हंगामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते आज करण्यात आला त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक, ऋषिकेश परिचारक यांचे समवेत सर्व खाते प्रमुख,कर्मचारी व कामगार बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यावेळी बोलताना परिचारक म्हणाले की, कारखाना 9 व्या गळीत हंगामास पूर्ण क्षमतेने सामोरे जात आहे.

मागील वर्षी युटोपियन ने उच्चांकी गाळप केले होते.चालू वर्षी कारखान्याने विस्तारीकरण करून प्रतिदिनं 5200 मे.टन गाळप करण्याचा मानस ठेवला आहे.सर्व यंत्रणा अद्यावत करण्यात आली आहे. मात्र, सततच्या पावसामुळे चालू गळीत हंगाम 8-10 दिवस उशिराने चालू होत आहे. खरीपाची पिके पूर्णत: पाण्याखाली गेली आहेत.

शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याप्रमाणात सततच्या पावसामुळे ऊस उत्पादक वर्गाचे नुकसान कमी आहे. हंगामाच्या सुरूवातीला जास्तीचा पाऊस झाल्याने रिकव्हरी कमी लागत असते. तरी सुद्धा चालू गळीत हंगाममध्ये मागील सर्व गाळपाचे रेकॉर्ड मोडीत काढून नवा उच्चांक प्रस्थापित करण्याचा आमचा मानस असून चालू गळीत हंगामा करीता 7 लाख 51 हजार मे.टन गाळपाचे उद्दीष्ट ठेवले.

तसेच चालू गळीत हंगामा मध्ये प्रतीदिन 60 हजार लिटर इथेनॉल उत्पादन करताना कारखान्याची एकूण एफआरपी ही 2180 रु. आहे . त्यामुळे मागील गळीत हंगाम मध्ये गाळप केलेल्या ऊसास प्रती मे.टन 120 रु. इतका दर हा एफआरपी पेक्षा जास्तीचा दर होत आहे. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार लक्ष्मण पांढरे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT