Solapur Assembly Election 2024 sakal
सोलापूर

Solapur Assembly Election 2024 : सोलापुरातील निवडणुकीत सेट होतोय ‘एमपीएल’ फॅक्टर

Solapur Vidhan Sabha Election 2024 : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ‘आपला माणूस, आपला आमदारची रणनीती

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : मुंबईनंतरचे कॉस्मोपॉलिटन शहर म्हणून सोलापूरची ओळख आहे. या शहरात अनेक भाषा अन्अनेक जातीचे लोक पिढ्यांन्‌पिढ्या गुण्या गोविदांने राहात आहेत. या शहरातील प्रमुख जाती-धर्मांसाठी २०२४ ची विधानसभा निवडणूक आमदारकीचा मौका घेऊन आली आहे.

आमदारकीची अशी संधी अनेकवेळा आली होती, परंतु प्रमुख पक्षाच्या उमेदवारीत ही संधी ऐनवेळी हिरावली जात होती. आता २०२४ च्या निवडणुकीत आमदारकीची ठळक संधी दिसू लागल्याने सोलापुरातील मुस्लिम-पद्मशाली-लिंगायत (एमपीएल) फॅक्टर सेट होताना दिसत आहे.

२००४ मध्ये आमदार झालेले नरसय्या आडम हे या शहरातील शेवटचे पद्मशाली नेते आहेत. त्यानंतर २००९, २०१४ व २०१९ या निवडणुकीत महेश कोठे यांनी नशीब अजमावले. कधी जवळच्यांनी निवडणुकीत तर पक्षातील नेत्यांनी उमेदवारीत ऐनवेळी डाव टाकल्याने त्यांची आमदारकीची संधी हुकली.

यावेळी पद्मशाली समाजातील महेश कोठे हे सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तर देवेंद्र कोठे हे भाजपकडून शहर मध्यमधून नशीब अजमावत आहेत. याशिवाय नरसय्या आडम हे माकपकडून शहर मध्यमधून मैदानात आहेत. दोन्ही कोठेंना यावेळी आमदारकीची अधिक संधी दिसून लागल्याने पद्मशाली समाज एकवटताना दिसत आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवारांचे विश्‍वासू सहकारी युन्नुसभाई शेख यांना विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून दोनवेळा संधी मिळाली. परंतु चाळीस वर्षात सोलापूर शहरातील मुस्लिम समाजाला एकदाही विधानसभेवर संधी मिळाली नाही.

अनेकांना अनेकदा प्रयत्न केले परंतु हे प्रयत्न यशस्वी झाले नाही. यावेळी शहर मध्यमधून एमआयएमकडून फारूक शाब्दी यांना आमदारकीची संधी दिसत असल्याने त्यांच्यासाठी मुस्लिम समाज एकवटताना दिसत आहे. मध्य मतदारसंघात मुस्लिम समाजाची बंडखोरी होऊ नये, यासाठी समाज म्हणून ठोस प्रयत्न होताना दिसत आहेत.

काँग्रेस राष्ट्रवादीकडून १९९९ मध्ये आमदार झालेले विश्‍वनाथ चाकोते हे लिंगायत समाजाचे शेवटचे नेते आहेत. त्यांच्यानंतर भाजपने विजयकुमार देशमुख चार वेळा आमदारकी मिळाली, आता त्यांना पाचव्यांदा संधी दिली आहे. सोलापूर दक्षिणमधून सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी हे यंदा अपक्ष म्हणून मैदानात आहेत. अपक्ष काडादी यांच्या पाठीशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे पाठबळ तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आशीर्वाद मानला जात आहे. या मतदारसंघातून तीन टर्मनंतर लिंगायत समाजाचा आमदार करण्याची संधी असल्याने येथील सामाजिक समीकरणे जुळू लागली आहेत.

इतर समाजांचीही साथ महत्त्वाची

सोलापुरातील तीन विधानसभा मतदारसंघात ‘एमपीएल’ फॅक्टर यशस्वी होण्यासाठी अनुसूचित जाती, धनगर, मोची, मराठा, जैन व मारवाडी, लोधी या प्रमुख समाजांचीही साथ महत्त्वाची आहे. या समाजाची साथ मिळविण्यासाठी काही जणांनी पक्षाच्या झेंड्यावर आणि वैयक्तिक स्वभावाच्या जिवावर प्रयत्न सुरू केले आहेत. सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, सोलापूर दक्षिण मतदारसंघाचा यंदाचा निकाल सोलापूरच्या समाजकारणाला आणि राजकारणाला नवीन दिशा देणार असल्याचे दिसते.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT