विद्या पोळ sakal
सोलापूर

सोलापूर : उपायुक्तपदी विद्या पोळ रुजू

महापालिकेच्या दोन्ही रिक्त उपायुक्त पदांवर आता नूतन उपायुक्त कामकाज पाहणार

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : नागपूर महापालिकेतील उपायुक्त पदाचा पदभार घेऊन अवघ्या आठच दिवसांत सोलापूर महापालिका उपायुक्तपदी बदली होऊन आलेल्या विद्या पोळ गुरुवारी उपायुक्त म्हणून रुजू झाल्या आहेत. महापालिकेच्या दोन्ही रिक्त उपायुक्त पदांवर आता नूतन उपायुक्त कामकाज पाहणार आहेत.

उपायुक्त विद्या पोळ या मूळच्या सातारा येथील आहेत. १२ वर्षे शिक्षिका म्हणून काम पाहिल्यानंतर २०१० ला त्यांची सहाय्यक आयुक्त म्हणून सांगली, मिरज, कूपवाड महापालिकेमध्ये झाली. त्यानंतर पाचगणी, वाई नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून काम पाहिल्या. यानंतर कोल्हापूर महापालिकेमध्ये कर विभागाच्या सहाय्यक आयुक्त म्हणून काम पाहिल्या. त्यांची पदोन्नतीने नागपूर महापालिकेमध्ये उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली. अवघ्या आठ दिवसांतच परत त्यांची सोलापूर महापालिकेमध्ये उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली. नियुक्तीनंतर त्यांनी गुरुवारी महापालिकेमध्ये येऊन पदभार घेतला. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी उपायुक्त मच्छिंद्र घोलप, धनराज पांडे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Urdu Schools Timing: उर्दू शाळांच्या वेळा बदलणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय, कारण काय? जाणून घ्या...

मी सांगत होते मला कपडे बदलू द्या... घराबाहेर येताच सोनालीने केली पोलखोल; म्हणते- चौथ्या दिवशीच बटवर इन्फेक्शन...

तेव्हा त्याचे काही प्रॉब्लेम नव्हते... मराठी अभिनेत्रीने सांगितला मंदार देवस्थळीसोबतचा अनुभव; झी मराठीवरच केलेली मालिका

Ajit Pawar: कात्रज दूध संघाला ‘अजित पवार’ यांचं नाव देण्याचा निर्णय; 'असं' असेल पूर्ण नाव

Latest Marathi News Live Update: वाशिममध्ये वीटभट्टी जवळील विहरीत पडून तीन वर्षीय मुलीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT