solapur vikas manch demand to start from solapur to nagpur goa pune vande bharat express Esakal
सोलापूर

Vande Bharat Express : नागपूर अन्‌ गोव्यासाठी सोलापूर विकास मंचने वंदे भारत एक्स्प्रेसची केली मागणी

सोलापूर विकास मंचच्या निवेदनाने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादवांचे वेधले लक्ष

सकाळ वृत्तसेवा

Solapur News : सोलापूर येथून नागपूर, गोवा व पुणे-सिकंदराबाद या वंदे भारत एक्स्प्रेस सुरु कराव्यात अशी मागणी सोलापूर विकास मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. सोलापूरच्या प्रलंबित रेल्वे विकासाच्या प्रश्नावर सोलापूर विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांची भेट घेऊन विविध मागण्या त्यांच्याकडे मांडल्या.

यावेळी सोलापूर विकास मंचाचे केतन शहा, विजय कुंदन जाधव, अॅड.दत्तात्रय अंबुरे, श्रीनिवास गोयल, योगिन गुर्जर, मिलिंद भोसले, अॅड. प्रमोद शहा, सुहास भोसले, आनंद पाटील आदी उपस्थित होते.

रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण काढावीत. रेल्वेचे प्लॅटफॉर्म वाढवून जुन्या मालधक्का येथे नवीन प्लॅटफॉर्म करून तेथून गाड्या सोडाव्यात. मीटर गेज रुळाच्या जागेवरील अतिक्रमण काढल्यास जुळे सोलापुरातील प्रवाशांचा वेळ वाचेल. सोलापूर स्थानकास पूर्व व पश्चिमेकडून प्रवेशद्वार केल्यास म.गांधी चौकातील वाहतुकीचा दबाव कमी होणार आहे. असे मागण्यात नमुद आहे.

मंचच्या ठळक मागण्या

  • चार आणि पाच नंबर प्लॅटफॉर्म वर लिफ्ट व एस्क्लेटर होणे गरजेचे

  • होटगी स्थानकापर्यंत येणारी हुबळी सिकंदराबाद ही गाडी सोलापूर पर्यंत आणावी

  • हुतात्मा एक्सप्रेसला एक जनरल बोगी पूर्वीप्रमाणे कायम ठेवावी

  • हुतात्मा एक्सप्रेसला तीन स्लीपर कोच काढून पूर्वीप्रमाणे चेअर कोच ठेवावेत

  • वंदे भारत, हुतात्मा व सिद्धेश्वर ह्या तीनही गाड्या प्लॅटफॉर्म क्र एक वरूनच सोडाव्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT