मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  sakal
सोलापूर

Solapur : आषाढीच्या शासकीय महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी घेतली मुंबईत भेट

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेस येण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून मुंबईत जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटून निमंत्रण देण्याची नवी प्रथा सुरु झाली आहे. त्यानुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या नेतृत्वाखाली मंदिर समितीच्या सदस्यांनी मुंबईत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून आषाढीच्या शासकीय महापूजेचे निमंत्रण दिले.

आषाढी एकादशीची श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावी या हेतूने ही पूजा केली जाते. (कै.) वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांनी आषाढीची शासकीय महापूजा केली. तेव्हापासून एक, दोन वर्षांचा अपवाद वगळता ही प्रथा दरवर्षी अखंडित सुरु आहे. गेल्या काही वर्षांत राज्यात उपमुख्यमंत्रिपद निर्माण झाले. तेंव्हा पासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढीची तर उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्तिकीची शासकीय महापूजा करण्याची प्रथा सुरु झाली.

विठुरायाच्या या शासकीय महापूजेसाठी पूर्वी मंदिर समितीचे अध्यक्ष अथवा सदस्य मुख्यमंत्र्यांना भेटून निमंत्रण वगैरे देत नसत. प्रथेप्रमाणे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शासकीय महापूजेसाठी पंढरपूरला येत असत. परंतु गेल्या काही वर्षांपासून आषाढीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांना मुंबईत जाऊन भेटून निमंत्रण देण्याची नवी प्रथा सुरु झाली आहे. त्यानुसार आज मुंबईत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्षपद रिक्त असल्याने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज

औसेकर यांच्या नेतृत्वाखाली मंदिर समितीच्य़ा सदस्या ॲड.माधवी निगडे, शकुंतला नडगिरे, प्रकाश महाराज जवंजाळ, जिल्हाधिकारी तथा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, आदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून त्यांचा वीणा आणि श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देऊन सत्कार करून आषाढीचे निमंत्रण दिले. कृषिमंत्री दादा भुसे, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे आदी यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India in WC Final: थँक्स टू Jesus! भारताला फायनलमध्ये पोहोचवल्यावर जेमिमा रॉड्रिग्ज भानविक झाली; म्हणाली, शतकापेक्षा भारत जिंकणं महत्त्वाचं होतं...

IND beat AUS in Semi Final: विजयी धाव अन् जेमिमा रॉड्रिग्जसा अश्रू अनावर, हरमनप्रीत कौरही रडली; मुंबईच्या पोरीने मोडला गौतम गंभीरचा विक्रम Video Viral

IND vs AUS Semi Final: शाब्बासsss जेमिमा रॉड्रिग्ज! टीम इंडिया फायनलमध्ये; हरमनप्रीत कौरसह मिळवला विश्वविक्रमी विजय

farmer Loan Waiver Maharashtra: शेतकरी कर्जमाफीबाबत महायुती सरकारचा मोठा निर्णय! खुद्द फडणवीसांनीच केली घोषणा, म्हणाले...

Local Elections Maharashtra Update : राज्यात आठ वर्षांनंतर स्थानिक निवडणुकांसाठी उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढली!

SCROLL FOR NEXT