Solapur Water Supply Sakal
सोलापूर

Solapur Water Supply : सोलापूरचा पाणीपुरवठा एक दिवस लांबणीवर; जलवाहिनीला पाच ठिकाणी गळती

ऐन उन्हाळ्यात उजनी ते सोलापूर या जुन्या जलवाहिनीला पाच ठिकाणी गळती लागली आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी उद्या (शनिवारी) शटडाऊन घेतला जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : ऐन उन्हाळ्यात उजनी ते सोलापूर या जुन्या जलवाहिनीला पाच ठिकाणी गळती लागली आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी उद्या (शनिवारी) शटडाऊन घेतला जाणार आहे. त्यामुळे सोलापूर शहरासह चिंचोली एमआयडीसीचा पाणीपुरवठा एक दिवस बंद राहणार आहे. गळती थांबविण्याचे काम युद्धपातळीवर केले जाणार आहे.

सोलापूरची तहान भागविण्यासाठी १९९८ मध्ये सोलापूर ते उजनी जलवाहिनी टाकण्यात आली. जुनाट झालेल्या जलवाहिनीला लागलेली गळती पुन्हा वारंवार थांबवावी लागली. आतापर्यंत जुनी जलवाहिनी दुरुस्तीसाठी अंदाजे तीन ते साडेतीन कोटींचा खर्च झाला आहे. अजूनही दुरुस्ती सुरूच आहे.

वडवळजवळील कोळेगाव फाटा परिसरातील वर्धमान, बाळे पुलाखाली, उजनीजवळ भीमानगर, वरवडे फाटा व उजनी हेडवर्क (पंपहाऊसजवळ) या पाच ठिकाणी जलवाहिनीला गळती लागली आहे.

त्याची दुरुस्ती हाती घेण्यात आल्याने एक दिवस पाणी उपसा बंद ठेवला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्या (शनिवारी) सोलापूर महापालिकेच्या उजनीवरून येणाऱ्या जलवाहिनी दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद राहणार असून त्यामुळे चिंचोली एमआयडीसीतील पाणी पुरवठा बंद राहील.

आपल्या आवश्यकतेनुसार पाणीसाठा करून घ्यावा, दुरुस्तीनंतर कमी दाबाने व नंतर सुरळीत पाणीपुरवठा होईल, गैरसोयीबद्दल दिलगिरी असा मेसेज महापालिकेकडून सर्वांना देण्यात आला आहे.

दरम्यान, रमजान उत्सव संपल्यानंतर १२ एप्रिल रोजी देखील सोरेगाव हद्दीतील दुरुस्तीसाठी दोन दिवसांचा शटडाऊन घेतला जाणार असून त्यावेळी देखील पाणीपुरवठा विस्कळित होणार आहे.

उजनीचे पाणी पंढरपूरच्या पुढे

उजनी धरणातून ११ मार्च रोजी रात्री भीमा नदीद्वारे सोडलेले पाणी २१ मार्चपर्यंत औज बंधाऱ्यात पोचणार आहे. आता ते पाणी पंढरपूरच्या पुढे आले असून उजनीपासून २४० किमी अंतर पार करायला दहा दिवस लागतात. औज बंधाऱ्यात पाणी पोचल्यानंतर उजनीतून सोडलेले पाणी बंद केले जाणार आहे. धरण सध्या उणे २३.३२ टक्क्यांवर आहे.

एक रोटेशनसाठी चारऐवजी पाच दिवसाआड पाणी

उजनी-सोलापूर मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीसाठी शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे सोलापूर शहराचा पाणी पुरवठा शनिवार (ता. १६) एक रोटेशनसाठी चार दिवसाआडऐवजी पाच दिवसाआड करण्यात येणार आहे.

दुरुस्ती कामासाठी महापालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागामार्फत शनिवारी (ता. १६) शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी उजनी पंपहाऊस बंद राहणार असल्याने उजनी-पाकणी येथून सोलापूर शहरास पाणी पुरवठ्याकरीता पाणी उपलब्ध होणार नाही.

त्यामुळे पूर्ण शहराचा पाणी पुरवठा शनिवारी (ता. १६) पासून एक रोटेशनसाठी चार दिवसाआडऐवजी पाच दिवसाआड करण्यात येणार आहे, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी सांगितले.

सोलापूर- उजनी जलवाहिनीला काही ठिकाणी गळती लागली असून त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे उद्या (शनिवारी) एक दिवस जलवाहिनीद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुरुस्तीनंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल.

- व्यंकटेश चौबे, अभियंता, सार्वजनिक आरोग्य व पाणीपुरवठा, महापालिका, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT