solapur water supply issue ujani water line burst marathi news esakal
सोलापूर

Solapur Water Supply : सोलापूरचा पाणीपुरवठा विस्कळित; लांबोटीजवळ फुटली मुख्य उजनी जलवाहिनी

सोलापूर- पुणे महामार्गावरील लांबोटी येथे उजनी - सोलापूर मुख्य जलवाहिनीला बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास गळती

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर- पुणे महामार्गावरील लांबोटी येथे उजनी - सोलापूर मुख्य जलवाहिनीला बुधवारी (ता. २५) दुपारी साडेतीनच्या सुमारास गळती लागली. अचानक लागलेल्या गळतीमुळे परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. उंचच उंच फवारे उडत होते. मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. दरम्यान महापालिकेच्या आरोग्य अभियंता विभागाने युद्ध पातळीवर गळती दुरुस्ती करण्याच्या कामाला सुरवात केली.

गळतीच्या परिणामातून दोन ते तीन दिवस पाणीपुरवठा विस्कळित होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पावसाळ्यात सोलापूर जिल्ह्याला म्हणावा तसा पाऊस झाला नाही. एकीकडे उजनी ५८ टक्यांवर आले आहे. दुसरीकडे सोलापूर शहराला पाणीपुरवठा ऐन सणासुदीच्या काळात विस्कळित होत चाललेला आहे.

दरम्यान, बुधवारी दुपारी अचानक लांबोटी पुलाजवळ सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनीला गळती लागली. यामुळे दीडशे ते दोनशे फूट उंच पाण्याचे फवारे उडत होते. येणारे जाणारे नागरिक मोबाईल मध्ये पाणी गळतीचा व्हिडिओ घेत होते.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागास माहिती मिळताच तातडीने पाणीपुरवठा अधिकारी नीलकंठ मठपती व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

येथे जलवाहिनीला दोन दिवसांपूर्वीच छोटी गळती लागली होती. महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून व प्रत्यक्ष भेटूनदेखील याची कल्पना दिली होती. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे पूर्णतःदुर्लक्ष केले.

छोट्या गळतीचे बुधवारी सकाळी जलवाहिनी फुटण्यात रूपांतर झाले. बुधवारी सकाळी जलवाहिनी फुटल्याचे महापालिका प्रशासनास सांगितल्यानंतर तत्काळ त्याची दुरुस्ती न करता सायंकाळी साधारणतः ५ वाजण्याच्या सुमारास दुरुस्तीसाठी कर्मचारी आले. दोन दिवस लागलेल्या गळतीकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्यानेच जलवाहिनी फुटली. जलवाहिनीच्या गळतीमधून २.५ एकर ज्वारीच्या पिकाचे पूर्ण नुकसान झाले. जलवाहिनी फुटण्यातून आमच्या ज्वारी पिकाचे नाहक नुकसान झाले.

- भारत होनमाने, लांबोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Japan first female Prime Minister : जपान रचणार इतिहास! देशाला मिळणार पहिल्या महिला पंतप्रधान; जाणून घ्या, कोण आहेत साने ताकाइची?

व्ही शांताराम यांची उलटीही त्यांनी हातात घेतली... संध्या यांच्याबद्दल सावत्र मुलीने केलेले मोठे खुलासे; म्हणाली, 'त्यांच्यासारखी बाईच...

Government schemes : सरकारी योजनांची साथ आणि उद्योजकीय स्वप्ने; एका महिलेची प्रेरणादायी कहाणी

Sameer Bhujbal : शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार! मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर समीर भुजबळांकडून येवल्यात मदतीचा दिलासा

"म्हणून व्हेंटिलेटर’ लिहायला मला ४८ वर्ष लागली! " वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हल मध्ये राजेश मापुस्करांचा खुलासा

SCROLL FOR NEXT