Solapur news esakal
सोलापूर

Solapur : धर्मवीर संभाजी तलावात तब्बल दहा वर्षांनंतर पाच प्रकारच्या बोटिंगची सुविधा

महिनाअखेर धर्मवीर संभाजी तलावात सुरू होणार बोटिंग

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर, ता. २ : येथील धर्मवीर संभाजी तलावात तब्बल दहा वर्षांनंतर विविध पाच प्रकारच्या बोटिंगची सुविधा महापालिका मक्तेदारांकडून उपलब्ध करून देणार आहे. तलावात आठ बोटी दाखल झाल्या असून आता रायर्डसची प्रतीक्षा आहे. सध्या तलावातील पाण्याची चाचणी सुरू आहे. महिनाअखेरपर्यंत बोटिंगची सुविधा नागरिकांच्या सेवेत असणार आहे.

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेंतर्गत १२ कोटी रुपये खर्चून धर्मवीर संभाजी तलावाचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. तलाव शुद्धीकरण, तलाव परिसरातील स्थापत्य कामे, सांडपाण्यावरील प्रकिया व परिसरात आकर्षक सुशोभीकरण आदी कामांचा यात समावेश आहे. त्यात पर्यटनवाढीच्या दृष्टीने बोटिंगची सुविधा उपलब्ध करून देत या परिसराची शोभा आणखीन वाढविण्यासाठी महापालिका भूमी व मालमत्ता विभागाने बोटिंगसाठी निविदा काढली होती. दहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेली बोटिंगची सेवा आणि झालेला अपघात याचा सारासार विचार करून कडक नियमावलींसह नोव्हेंबर २०२१ मध्ये निविदा काढली होती.

या निविदा प्रक्रियेत तीन संस्थांनी सहभाग नोंदविला. त्यात युनिटी या कंपनीला बोटिंगचा मक्‍ता देण्यात आला आहे. मक्ता निश्चित करून सहा महिने लोटले. दरम्यान, पावसाळा व इतर तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी बोटिंग सुविधा वेटिंगवर होती. अखेर याला मुहूर्त लागला असून चार प्रकारच्या आठ बोटी दाखल झाल्या आहेत. आता रायडर्सची प्रतीक्षा आहे. तत्पूर्वी, पाणी पातळीची चाचणी, जलपर्णी काढणे, तिकीट बुकिंग कक्ष, बोटी ठेवण्यासाठी फ्लोटिंग जेटची उभारणी आदी बाबींची पूर्तता करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

Yavatmal Healthcare: १०२ वर वारंवार फोन, तरी रुग्णवाहिका आली नाही; राळेगावात जंगलातच महिलेची प्रसूती

Marathi News Live Updates : लोहगावमध्ये रस्त्यावरील खड्ड्याला चक्क चिकटपट्टी लावून पुणेकराचे अनोखे आंदोलन, महापालिकेच्या कारभाराचा जाहीर निषेध

दीड तासांचा प्रवास ५ मिनिटांत पूर्ण होणार! वर्सोवा केबल-स्टेड पुलास हिरवा कंदील, २१ किमीचे अंतर अवघ्या दीड किमीवर

SCROLL FOR NEXT