यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस Sakal
सोलापूर

Solapur Weather Update : यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस; ४ मेपर्यंत राहणार उच्चांकी तापमान

यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद आज सोलापूर शहर व परिसरात झाली. आज सोलापुरात ४३.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद आज सोलापूर शहर व परिसरात झाली. आज सोलापुरात ४३.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. यापूर्वी ५ एप्रिल रोजी या हंगामातील उच्चांकी ४३.१ अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती.

सोलापूरच्या तापमानाची आता ४४ अंश सेल्सिअसकडे वाटचाल सुरू झाली आहे. सोलापूर शहर व परिसरात ४ मेपर्यंत ४२ ते ४३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

वाढत्या तापमानामुळे सोलापूरकर अक्षरश: हैराण झाले आहेत. सकाळी नऊपासूनच उकाडा जाणवत असून यात आबालवृद्धांना अधिक त्रास होत आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून सोलापूरच्या तापमानाचा पारा ४१ ते ४२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहात होता.

२४ एप्रिलला ४१.२, २५ एप्रिलला ४१.१, २६ एप्रिलला ४१.२ तर २७ एप्रिलला ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. कालच्या तुलनेत आजच्या तापमानात थेट १.७ अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. मार्च महिन्यात सोलापुरात ४१.४ अंश सेल्सिअस एवढ्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. बाहेर उन्हाचा चटका आणि घरात उकाडा यामुळे सकाळी नऊ पासूनच अंगाला चटके बसू लागले आहेत. रात्री उशिरापर्यंत उष्ण झळा जाणवत आहेत.

एप्रिलमध्ये ४४.९ चा उच्चांक

सोलापूर शहर व परिसरात एप्रिलमध्ये सरासरी ४२ ते ४३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहात असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. सोलापुरात २२ एप्रिल २०१६ रोजी ४४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. गेल्या बारा ते तेरा वर्षातील हे उच्चांकी तापमान आहे. एप्रिलमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यात मुसळधार अवकाळी पाऊस झाल्याच्याही नोंदी हवामान विभागाकडे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT