Solapur weather newsUntimely rains hit Borgaon Gholasgaon area damage to watermelon mango
Solapur weather newsUntimely rains hit Borgaon Gholasgaon area damage to watermelon mango  SAKAL
सोलापूर

अवकाळी पावसाने बोरगाव घोळसगाव भागात झोडपले

सकाळ वृत्तसेवा

अक्कलकोट : बोरगाव देशमुख व घोळसगाव ता.अक्कलकोट परिसरातील गावांमध्ये आज सायंकाळी पाचच्या आसपास मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने जोरदार झोडपल्याने या भागातील केळी, कलिंगड, टरबूज,पपई आदी फळपिकांसह फुलशेती यासह वेलवर्गीय पिकांचे मोठे नुकसान झाले.अनेक घरावरील पत्रे उडाल्याने तारांबळ उडाली. अगोदरच त्रासलेला बळीराजा व अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

शनिवारी झालेल्या वादळी पावसामुळे फळबागांचा व इतर पिकांचे नुकसान झाले आहे.घोळसगाव, बादोले ,पालापूर,देशमुख बोरगाव देशमुख तसेच शिरवळ या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली.वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होते.अशातच विज येणेजाणे सुरू असल्याने नागरिक त्रस्त आहेत.सुरुवातीला प्रचंड वादळी वारा सुटले होते त्यामुळे चिंच व कच्चे आंबे मोठ्या प्रमाणात गळून पडले. सगळीकडे धुळीचे लोट व प्रचंड वाऱ्यामुळे अनेकांचे घरावरील व वस्तीवरील पत्रे उडाले.

यानंतर मेघगर्जनेसह मुसळधार पावसासह गारपीट सुद्धा झाली.वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडले असून आंब्याची गळती मोठ्या प्रमाणात झाली आहे.तापमानाचा पारा 42 वर गेला होता.हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरणा दरम्यान दुपारी 5 वाजताच्या सुमारास अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव आणि जिल्ह्यातील इतर गावांत ठिकाणी गारांचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील उन्हाचा जोर कमी झाला होता. त्यातच आता गारांसह पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांत भीती निर्माण झाली आहे. उन्हाळी पिकाचे नुकसान होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT