जि. प. कर्मचारी पतसंस्थेची मतदार यादी १३ फेब्रुवारीला अंतिम Sakal
सोलापूर

Solapur News : जि. प. कर्मचारी पतसंस्थेची मतदार यादी १३ फेब्रुवारीला अंतिम; हरकतींवर उद्या अंतिम निर्णय; निवडणूक चुरस

साडेआठ वर्षानंतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था क्रमांक ‘एक’ची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांमध्ये आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Solapur News : साडेआठ वर्षानंतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था क्रमांक ‘एक’ची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांमध्ये आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी जिल्ह्यातील २९ पतसंस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतसंस्था क्रमांक एकच्या निवडणुकीचाही समावेश आहे.

या पतसंस्थेची यापूर्वीची निवडणूक एप्रिल २०१५ मध्ये झाली होती. कोरोनामुळे विद्यमान संचालकांना सुमारे साडेतीन वर्षे मुदतवाढ मिळाली. आता जिल्हा उपनिबंधकांनी या पतसंस्थेचीही निवडणूक जाहीर केली आहे. २५ जानेवारीला पतसंस्थेची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून २ फेब्रुवारीपर्यंत हरकती मागविल्या.

त्या हरकतींवर ८ फेब्रुवारीला (गुरुवारी) निर्णय होईल. १३ फेब्रुवारी रोजी पतसंस्थेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर मतदानाचा कार्यक्रम जाहीर होईल. दरम्यान, विद्यमान संचालकांचे कामकाज पाहता त्यांचेच पारडे जड असल्याची सद्य:स्थिती आहे. निवडणुकीसाठी विद्यमान संचालकांविरुद्ध कोणाचा पॅनेल असणार हे काही दिवसांत स्पष्ट होईल.

सर्वात जुनी अन्‌ आर्थिकदृष्ट्या सक्षम पतसंस्था

सोलापूर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची क्रमांक एक ही सर्वात जुनी पतसंस्था आहे. या पतसंस्थेचे एक हजार ३१५ सभासद असून त्यातील जवळपास ९२२ जण मतदानास पात्र आहेत. या संस्थेचे भाग भांडवल १६ कोटी सहा लाख असून बचत ठेव सहा कोटी ६४ लाखांपर्यंत आहे. संस्थेचा रिझर्व फंड दोन कोटी ९४ लाख असून संस्थेला गतवर्षात एक कोटी दहा लाखांचा नफा झाला. संस्थेने पाच टक्के लाभांश वाटपही केले आहे.

संस्थेचे कर्जवाटप २४ कोटी ५४ लाख असून गुंतवणूक एक कोटी ५२ लाखाची आहे. संस्थेला ‘अ’ वर्ग असून स्वमालकीची एक कोटीची सुसज्ज इमारत व विश्रामगृह देखील आहे. या पतसंस्थेच्या निवडणुकीत नेहमीच चुरस पाहायला मिळते. निवडणूक जाहीर झाल्याने विजयासाठी विद्यमान संचालकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. साडेआठ वर्षानंतर निवडणूक होत असल्याने चुरस पाहायला मिळेल अशी शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT