Solapur ZP Sakal
सोलापूर

सोलापूर : Zp, पंचायत समितीचेआरक्षण आज होणार अंतिम

जिल्हा परिषदेच्या ७७ तर पंचायत समितीच्या १५४ जागांसाठी निवडणूक होणार असून,

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. २ ऑगस्टअखेर मुदतीत जिल्हा परिषद गटासाठी १९ तर पंचायत समित्यांसाठी १० अशा एकूण २९ हरकती दाखल झाल्या. या हरकतींचा विचार करून उद्या (शुक्रवारी) आरक्षण अंतिम केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या ७७ तर पंचायत समितीच्या १५४ जागांसाठी निवडणूक होणार असून, त्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी (स्त्रियांच्या आरक्षणासह) राखून ठेवावयाच्या जागा आणि उर्वरित स्त्रियासांठी राखून ठेवावयाच्या जागा या सोडतीद्वारे निश्‍चित करण्यात आल्या होत्या. आरक्षणाचे प्रारुप २९ जुलै रोजी प्रसिद्ध करून त्यावर २ ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या.

दरम्यान, बुधवारी राज्य शासनाने महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका या २०१७च्या प्रभाग रचनेप्रमाणेच घेण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता प्रभाग रचना, गट आणि गणातही बदल होणार आहे. मात्र निवडणूक आयोगाचा आपल्याला अद्याप कसलाही आदेश प्राप्त झाला नसल्याचे सांगून जिल्‍हाधिकाऱ्यांनी पूर्वीचीच प्रक्रिया सुरू ठेवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT