1Corona_20akola_2001_1.jpg 
सोलापूर

सोलापूरकरांनो नियम पाळा ! शहरात वाढतोय कोरोना; रविवारी 30 तर आज 33 पॉझिटिव्ह

तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याचे चित्र आहे. तरीही टेस्टिंग वाढत नसून मागील काही दिवसांत सरासरी पाचशे ते साडेपाचशे संशयितांचीच टेस्ट केली जात आहे. आज (सोमवारी) 493 संशयितांमध्ये 33 जण पॉझिटिव्ह आढळले असून त्यातील एका 78 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

शहरात याठिकाणी आढळले रुग्ण
गुरुकृपा अपार्टमेंट (विजयपूर रोड), इशान हाइट्‌स (टिळक चौक), गुरुदेव नगर (एमआयडीसी), मुदगल बागेजवळ (पाथरूठ चौक), रेल्वे लाईन्स, गिरीराज बिल्डिंग (बुधवार पेठ), न्यू आरटीओ कार्यालयाजवळ, गोल्डफिंच पेठ, सनसिटी (दमाणी नगर), सात रस्ता, अभिषेक नगर (मुरारजी पेठ), शुक्रवार पेठ, काडादी चाळ (रेल्वे लाईन्स), संकेत अपार्टमेंट, टिव्हीएस शोरुमजवळ, दाजी गणपती मंदिराजवळ (उत्तर कसबा), लक्ष्मी पेठ (दमाणी नगर), ऐश्‍वर्या अपार्टमेंट (रेल्वे लाईन्स), अरविंदधाम पोलिस वसाहत (अवंती नगर), मार्कंडेय नगर (कुमठा नाका), रेल्वे क्‍वार्टरस्‌ (व्हीटीएस कार्यालयाजवळ), वसंत विहार (फेज-2 पुना नाका), पाच्छा पेठ, गुरुनाथ नगर (कुमठा नाका), श्रध्दा अपार्टमेंट (शेळगी), भवानी पेठ, गुरुनानक चौक याठिकाणी आज नवे रुग्ण आढळले आहेत.

अनलॉकउनंतर बाजारपेठांसह अन्य व्यवहार पूवर्वत झाले. मंदिरे सुरु झाली, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु झाली, उद्याने, बगिचा, चित्रपटगृहे, मॉल्सदेखील सुरु झाली. विवाह, सभा यासह अन्य सार्वजनिक कार्यक्रमांना 50 व्यक्‍तींची मर्यादा असतानाही त्याचे पालन केले गेले नाही. सर्वत्र बेशिस्तीचे दर्शन होत असतानाही महापालिका प्रशासनाने संशयितांचे टेस्टिंग वाढविले नाही. 18 फेब्रुवारीला 597 संशयितांमध्ये 26 पॉझिटिव्ह आणि एकाचा मृत्यू झाला होता. तर 19 फेब्रुवारीला 520 संशयितांमध्ये 29 पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यू, 20 तारखेला 536 संशयितांमध्ये 20 पॉझिटिव्ह आणि एकाचा मृत्यू, 21 फेब्रुवारीला 560 संशयितांमध्ये 30 पॉझिटिव्ह आणि आज 493 संशयितांमध्ये 33 पॉझिटिव्ह आणि एकाचा मृत्यू झाला. आता शहरातील एकूण रुग्णसंख्या 12 हजार 217 झाली असून त्यातील 651 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 448 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. परजिल्ह्यातून येणाऱ्यांची संख्या वाढली असून एसटी स्टॅण्डवर प्रवाशांच्या वैद्यकीय तपासणीची कोणतीच व्यवस्था करण्यात आलेली नाही. रुग्णसंख्या राज्यभर वाढत असतानाच महापालिकेने टेस्टिंगही वाढवावे, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT