Corona news Sakal
सोलापूर

सोलापूरची कोरोनामुक्तीकडे वाटचाल! अक्कलकोट, पंढरपूरसह ६ तालुक्यात नाही एकही रुग्ण

जिल्ह्यातील ५२५१ कुटुंबाचा आधार हिरावणारा कोरोना आता पुन्हा कमी होऊ लागला आहे. जिल्ह्यात सध्या १४ सक्रिय रुग्ण असून त्यांना कोणतीही तीव्र किंवा मध्यम स्वरूपाची लक्षणे नाहीत. दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील सहा तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही.

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्यातील पाच हजार २५१ कुटुंबाचा आधार हिरावणारा कोरोनाचा प्रादुर्भाव आता पुन्हा कमी होऊ लागला आहे. जिल्ह्यात सध्या १४ सक्रिय रुग्ण असून त्यांना कोणतीही तीव्र किंवा मध्यम स्वरूपाची लक्षणे नाहीत. दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील सहा तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही.

कोरोनाचा प्रादुर्भाव मागील महिन्यात खूपच वाढला होता. पण, आता कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याची स्थिती आहे. दुसरीकडे कोरोना संशयितांचे टेस्टिंग देखील दररोज सरासरी १०० पर्यंतच आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अक्कलकोट, माढा, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला व दक्षिण सोलापूर हे तालुके कोरोनामुक्त झाले आहेत.

दुसरीकडे बार्शी तालुक्यात सर्वाधिक चार रुग्ण असून तालुक्यातील ग्रामीण भागात एकही रुग्ण नाही. करमाळा व माळशिरस तालुक्यात प्रत्येकी दोन तर मोहोळ तालुक्यात एक रुग्ण आहे. पण, तिन्ही तालुक्यातील शहरी भागात कोरोनाचा एकही बाधित रुग्ण सद्य:स्थितीत नाही. सध्या ग्रामीणमधील आठ पुरुष व एक महिला तर शहरातील तीन पुरुष व दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

जिल्ह्याची आतापर्यंतची स्थिती

  • एकूण पुरुष बाधित

  • १,३२,५९४

  • महिला बाधित

  • ८९,८६०

  • एकूण बाधित

  • २,२२,४५४

  • कोरोनाचे बळी

  • ५,२५१

गर्दीत मास्क जरुरीचाच

गर्दीच्या ठिकाणी शक्यतो विशेषतः: पूर्वीचा गंभीर आजार असलेल्या व्यक्तीने मास्क घातलेला असावा. सर्दी, खोकला असलेल्यांनी ताबडतोब कोरोनाची चाचणी करून घ्यावी. वेळेत उपचार झाल्यास पुढील संभाव्य धोका टाळता येतो. सर्वांनीच कोरोनापूर्व खबरदारी घेतल्यास धोका कमी होतो. प्रतिबंधित लसीचे देखील डोस टोचून घेणे आवश्यक असल्याचे आरोग्याधिकाऱ्यांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT