training.jpg 
सोलापूर

सुट्टीत गावी आलेल्या 'त्या' सैनिकाने मरवडेच्या युवकांना दिली जीवनाची आगळी प्रेरणा !

श्रीकांत मेलगे

मरवडे(सोलापूर): मरवडे (ता.मंगळवेढा) येथील भारतीय सेनेत कार्यरत असणारे राहुल रमेश शिंदे हे सध्या सुट्टीच्या कालावधीत गावी आले आहेत. या सुट्टीच्या कालावधीत ते गावातील युवकांना सैनिकी प्रशिक्षणाचे धडे देत आहेत. गावातील युवकांचा या उपक्रमाला मोठया प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे. या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे ग्रामस्थाकडून कौतुक होत आहे. 

मरवडे येथील राहुल शिंदे भारतीय सेनेदलात पंजाब येथे नाईक या पदावर गेल्या तेरा वर्षांपासून सेवेत आहेत. यावर्षी गेल्या दोन महिन्यांपासून सेवांतर्गत सुट्टीच्या कालावधीत ते गावी आले आहेत. सुट्टीच्या कालावधीत गावी आल्यानंतर स्थानिक युवकामध्ये मोकाट फिरणे, कामधंद्याकडे दुर्लक्ष, निराशावादी विचार, मोबाइल गेमकडे ओढा यामुळे निराशादायक स्थिती दिसून आली. 

भारतीय सीमेवर देशाचे रक्षण करत आपल्या प्राणाची बाजी लावणाऱ्या राहुल शिंदे यांना गावातील भीषण वास्तव स्वस्थ बसू देणारे नव्हते. सुट्टीच्या कालावधीत या युवकांना योग्य अशी दिशा द्यावी यासाठी युवकांना सैनिकी प्रशिक्षण देणे सुरु केले. पूर्वी गावातील बोटावर मोजण्याइतके युवक सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रयत्न करीत असत. मात्र आता मोठया संख्येने युवक त्यांच्या प्रशिक्षणाला हजेरी असतात. सैनिकांची सुट्टी म्हटले की आराम व कुटूंबाबरोबर आनंदात मौजमजा करण्याचे दिवस असे मानले जाते. परंतु हीच सुट्टी आपल्या गावातील युवकांना आयुष्याची दिशा देण्यासाठी घालविणाऱ्या राहुल शिंदे यांनी स्वीकारलेला वेगळा मार्ग दीपस्तंभ ठरला आहे. 

मैदानी व्यायामाबरोबर जगण्याची शिकवण 
स्पर्धेच्या दृष्टीकोनातून आम्हाला मार्गदर्शन मिळत असल्याने भविष्यात पोलीस किंवा सैन्यदलात भरती होण्यासाठी निश्‍चितच कुठलीही अडचण येणार नाही. मैदानी व्यायामाबरोबर आयुष्य खऱ्या अर्थाने जगण्यासाठी आवश्‍यक शिकवणही मिळत आहे. 
-सूरज सूर्यवंशी,प्रशिक्षणार्थी युवक,मरवडे 

प्रशिक्षण कायमस्वरूपी असावे. 
सुट्टीच्या कालावधीत गावातील युवकांना सैनिकी शिक्षणाचे धडे देत असल्याने सुट्टीचा उपयोग झाल्याने समाधान वाटले. गावातील माजी सैनिक, सैन्यदलातून सुट्टीवर आलेले सैनिक यांची मदत घेत हे प्रशिक्षण कायमस्वरूपी असावे. 
-राहुल शिंदे,नाईक,भारतीय सेना 


शिंदे कुटूंबियांची तिसरी पिढी देशसेवेत 
मरवडे येथील शिंदे कुटूंबियांची तिसरी पिढी भारतीय सेना दलात देशसेवेत आहे. राहुल शिंदे यांचे वडील रमेश शिंदे व आजोबा केराप्पा शिंदे सुभेदार मेजर पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत तर चुलते प्रल्हाद नारायण शिंदे हे सुभेदार मेजर म्हणून कार्यरत होते. देशसेवेचा वसा शिंदे कुटूंबियांनी घेतला असताना गावातही विविध सामाजिक उपक्रमात ते नेहमीच सहभागी होत असतात. 
 

संपादन ः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अश्लील व्हिडिओ बघत आहे म्हणून CBI ने पाठवला मेल; ओपन करताच दिसलं असं...नेमकी भानगड काय?

IND vs SA 4th T20I: हे काहीतरी वेगळंच! भारत-दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे नाही, तर 'या' गोष्टीमुळे उशीरा सुरू होणार

Railway News: आता तिकीट कन्फर्म होणार की नाही हे 10 तास आधीच समजणार; वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा

घरी उपाशी आहात की खिचडी खाताय हे... 'आई कुठे...' फेम कांचन आजींनी केली इंडस्ट्रीची पोलखोल; म्हणतात- मराठीत...

Latest Marathi News Live Update : भरचौकात तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार

SCROLL FOR NEXT