solapur sakal
सोलापूर

Solpaur : बार्शीतील रस्त्यांबाबत उच्च न्यायालयात याचिका !

रस्ते, धूळ, अपुरी व सदोष गटारव्यवस्था यातून निर्माण होणारे मानवी आरोग्याला घातक प्रश्न याबाबत याचिका दाखल

सकाळ वृत्तसेवा

बार्शी : शहरातील खड्डेमय रस्ते, त्यामुळे वाढलेली धूळ, अपुरी व सदोष गटारव्यवस्था, यातून निर्माण होणारे मानवी आरोग्याला घातक प्रश्न याबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली असल्याची माहिती ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. असिम सरोदे यांनी दिली.

येथील मनिष देशपांडे, दीनानाथ काटकर व इब्राहिम खान यांनी ऍड. असीम सरोदे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत बार्शी दिवाणी न्यायालयाने याबाबत परवानगी देण्याचे कोणतेही अधिकार स्पष्ट करणारे न्यायनिर्णय दिले नाहीत म्हणून दिवाणी न्यायाधीश तेजवंतसिंग संधु यांनी बार्शी न्यायालयात याचिका दाखल करण्यास नकार दिला होता.

समान समस्यांसाठी अनेक लोक एकत्र येऊन प्रातिनिधिक दावा दाखल करून सामाजिक हिताच्या मागण्या करीत असतील तर सर्व न्यायालयांनी त्यांची दखल घ्यावी, असे सार्वत्रिक लागू होणारे आदेश द्यावेत, बार्शीतील खड्डेमय रस्ते, अपुरी, अशास्त्रीय गटार यंत्रणा ठराविक कालावधीत दूर करण्याचे आदेश द्यावेत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हवेतील प्रदूषण मापन करून बार्शीतील धुळीच्या समस्येवर उपाय सुचवावेत अश्‍या मागण्या याचिकेतून करण्यात आल्या आहेत.

बार्शी नगरपरिषद, जिल्हाधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नगरविकास मंत्रालय, राज्याचे मुख्य सचिव, महसूल मंत्रालय, नगरपरिषद संचालनालय, मुंबई यांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आलेले आहे. याचिकेतून येणारा उच्च न्यायालयाचा निर्णय ऑर्डर 1 रुल 8 दिवाणी प्रक्रिया संहितेनुसार दाखल करण्यात येऊ शकणाऱ्या अनेक दाव्यांबाबत कायमस्वरूपी न्यायिक स्पष्टता येईल, अनेकांना स्थानिक पातळीवर न्याय मागण्याची कायद्याची योजना सक्रिय होईल, असे जेष्ठ विधीज्ञ ऍड.असीम सरोदे यांनी यावेळी स्पष्ट केले. याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड. असिम सरोदे, ऍड. अजित देशपांडे, ऍड. अक्षय देसाई, ऍड. अजिंक्‍य उडाणे काम पहात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : रेल्वे तिकीट तपासणीला आता बॉडी कॅमेऱ्याची नजर! १५ बॉडी कॅमेरे, ३० खास जॅकेट; एसी लोकलमध्ये विशेष देखरेख

‘गौतम गंभीर चांगला माणूस आहे, पण कोच म्हणून...’; हरभजन सिंगच्या या वक्तव्याने क्रिकेटविश्वात चर्चांना उधाण; नेमकं काय म्हणाला?

Sakal Tourism Expo 2026 : पुणेकरांना मिळणार पर्यटनाची मेजवानी! ‘सकाळ टुरिझम एक्स्पो २०२६’ २१ ते २३ ऑगस्टदरम्यान

Sakal Impact : ३ हजार ५६ विद्यार्थ्यांना दिलासा! कचरावेचकांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग अखेर मोकळा; ३० सप्टेंबरपर्यंत खात्यात जमा होणार शिष्यवृत्ती

Koyana Dam Water Release : कोयना धरणातून पाणी सोडण्यात येणार; कृष्णा-कोयना नदीकाठी सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT