Somnath Awaghade will be seen in the Jhund 
सोलापूर

अमिताभ बच्चन यांच्याबरोबर दिसणार आता जब्या?

अशोक मुरुमकर

सोलापूर : मराठी चित्रपटसृष्टीला वेगळं स्थान निर्माण करुन दिलेल्या नागराज मंजुळे यांच्या 'फँड्री' चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेला जब्या अर्थात सोमनाथ अवघडे 'झुंड'मध्ये दिसण्याची शक्यता आहे. मंगळवारी नागराज यांच्या झुंड या पहिल्याच हिंदी चित्रपटाचे टीझर प्रदर्शीत झाला आहे. या टीझरने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. या चित्रपटात जब्या नेमका कोणत्या भूमिकेत असेल हे सांगता येत नसले तरी टीझरमध्ये तो असल्याचे सांगितले जात आहे.
नागराज मंजुळे यांचा 'पिस्तुल्या' हा पहिला लघुपट होता. त्याला अनेक पुरस्कार मिळाले. त्यानंतर त्यांचा फँड्री चित्रपट हा चित्रपट प्रचंड गाजला. त्यालाही अनेक वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये केम (ता. करमाळा) येथील सोमनाथ अवघडे हा जब्याच्या भूमिकेत होता. हालगी वाजवणारा हा जब्या आता अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या झुंड या चित्रपटात दिसणार आहे, अशी चर्चा आहे. फॅंड्रीमध्ये जब्या व शालू (राजेश्‍वरी खरात) यांची मुख्य भूमिका होती. फॅंड्री झाल्यानंतर नागराज मंजुळे यांचा ‘सैराट’ हा चित्रपट आला होता. त्यानेही चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घातला. या चित्रपटातील आर्ची आणि परशाची जोडी अजून प्रेक्षकांच्या मनात आहे. 
झुंड या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका आहे. त्यांच्याबरोबर सोमनाथ अवघडे याला या निमित्ताने काम करण्याची संधी मिळाली आहे. मात्र, तो कोणत्या भूमिकेत असेल, आहे की नाही हे अद्याप स्पष्ट होत नाही. फुटबॉलवर आधारीत असलेल्या या चित्रपटाचे चित्रण मुंबई व नागपूर येथे झालेले आहे. त्याचे पोस्टर रिलीज झाल्यापासूनच नागराज यांच्या चित्रपटाची आतुरता लागलेली आहे. त्यातच मंगळवारी त्याचे टीझर प्रदर्शीत झाले आहे. त्यात सुरुवातील एक तरुणांचा घोळका जात आहे. त्यांच्या हातात साखळी, बॅट, वीट, दगड, हॉकी असे दिसत आहे. त्याच्यात जब्याही असल्याचे सांगितले जात आहे.  त्याच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT