Nagnath Jawale 
सोलापूर

अरे व्वा..! शेतमजुराचा मुलगा झाला पोलिस उपनिरीक्षक

सकाळ वृत्तसेवा

पटवर्धन कुरोली (सोलापूर) : पुनर्वसित उजनी वसाहत (ता. पंढरपूर) येथील शेतमजुराच्या मुलाची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक या परीक्षेत निवड झाली आहे.

छोट्याशा गावातील मुलाने मिळवले यश
उजनी धरणाच्या निर्मितीमुळे पटवर्धन कुरोलीजवळ पुनर्वसित झालेले उजनी वसाहत हे गाव. गावची लोकसंख्या जेमतेम पाचशे. या गावातील शेतमजुरी करणाऱ्या भाऊसाहेब जावळे यांचा नागनाथ भाऊसाहेब जावळे हा मुलगा होय. नागनाथचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण उजनी वसाहत येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण पटवर्धन कुरोली प्रशाला येथे झाले. अकरावी- बारावीचे शिक्षण भोसे येथील रयत शिक्षण संस्थेच्या यशवंत महाविद्यालयात तर पदवीचे शिक्षण पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात झाले. त्यानंतर त्याने पुणे येथील चाणक्‍य ऍकॅडमीला प्रवेश घेतला होता. उजनी वसाहतसारख्या छोट्याशा गावातून एका शेतमजुराच्या मुलाची पहिल्याच प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT