1bhalke_2 
सोलापूर

कोरोनाला चित करून रुग्णालयाबाहेर पडताच आमदार भालके झाले नागरी कामांमध्ये ऍक्‍टिव्ह !

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे दवाखान्यात उपचार घेत असलेले आमदार भारत भालके कोरोनाला चित करून दवाखान्यातून डिस्चार्ज झाले. डिस्चार्ज मिळताच त्यांनी नागरी कामांचा धडाका सुरू करत दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या "सकाळ'च्या बातमीची दखल घेतली व पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघासह जिल्ह्यात जनावरांसाठी लंपीची लस उपलब्ध करावी, अशी मागणी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. 

याशिवाय जिल्हाधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनाही निवेदन दिले. लॉकडाउन जाहीर झाल्यापासून दुधाचा दर कमी झाला; परंतु दारातील जनावरे विक्रीसाठी न्यावी तर बाजार देखील बंद असल्यामुळे आपली जनावरे सांभाळणे व जतन करण्याशिवाय दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसमोर पर्याय नाही. अशा परिस्थितीत पशुखाद्याचे दर 27 रुपये इतका जास्त असून, त्यावर मिळणारा दूधदर 25 रुपये आहे त्यामुळे पशुधनाची जोपासना करताना नाकी नऊ येऊ लागले. 

शेतीच्या उत्पन्नाबरोबरच दुग्ध उत्पादन हा जोडधंदा पूरक ठरल्याने तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात पशुधन वाढले. हेच पशुधन कोरोनामुळे आर्थिक अडचणीत आले. तालुक्‍यामध्ये 94 हजार 362 पेक्षा अधिक पशुधन असून त्यामधील काही जनावरांमध्ये लंपीची लक्षणे दिसू लागल्यामुळे त्यांच्यावर खासगी उपचार करताना अनाठायी खर्चाची वेळ आली आहे. 

सुरवातीच्या काळात पूर्व भागात असणारा लंपी तालुक्‍यात हातपाय पसरू लागला आहे. कोरोनामुळे कमी दरामुळे चिंतेतील पशुपालक लंपीमुळे आणखी चिंतेत आला आहे. खरिपात पावसाने झोडपून काढले व शेतीतील उत्पन्न शून्य झाल्यामुळे सर्व मदार सध्या पशुपालनावर अवलंबून आहे. हेच पशुधन लंपीला बळी पडत आहे. 94 हजार 362 पेक्षा अधिक संख्येने पशुधन असताना उपलब्ध केलेली लस जवळपास सात हजार आहे. या साथीचा प्रादुर्भाव वाढण्यापेक्षा पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे आमदार भालके यांनी केली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT