Sound of animals coming from the borewell 
सोलापूर

बोअरवेलमधून येतोय कुत्रा, इतर प्राण्यांसह पाणी खळखळल्याचा आवाज; तज्ज्ञांचे मत काय वाचा

अशोक मुरुमकर

सोलापूर : बोअरवेलमधून आटोमॅटिक पाणी... पाणी न लागलेल्या बोरअरवेलमधून चक्क १०० फूट पाण्याचे कारंजे... बोअरवेलला पाणी लागले आणि पाईपसह मोटार पाण्याच्या प्रेशरने वर फेकली... अशा अनेक घटना आपण ऐकल्या आहेत. असाच एक अगळावेगेळा प्रकार सोलापूर जिल्ह्यात नुकताच घडला आहे. करमाळा तालुक्यातील सिना नदी काटावरील कोळगाव येथे एका बोअरमधून कुत्रा, बेडूक आणि प्राणी घोरण्याचा विचित्र आवाज येत आहे. त्यामुळे या परिसरात वेगवेळी चर्चा रंगली आहे. या आवाजाची क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 
उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्याच्या सिमेवर सिना नदी काटी सोलापूर जिल्ह्यात कोळगाव आहे. सिना नदीवरील कोळगाव धरण म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. पावसाचा लहरीपणा आणि सतत पडणारा दुष्काळ, यामुळे धरण असून सुद्धा या भागात पाणी टंचाई जाणवत आहे. गेल्यावर्षी धरणात शेवटी झालेल्या पावसाने थोडे पाणी आले होते. मात्र, आता शेतीला पाणी कमी पडू लागले आहे. त्यामुळे शेतातील पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. एकीकडे जगभर कोरोनाने घातलेल्या थैमानात शेतकरी मात्र, पिक वाचवण्यासाठी संघर्ष करत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी हजारो रुपये घालवून शेतकरी बोअर घेताना दिसत आहेत.

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
करमाळा तालुक्यात अपवाद वगळता ३५० फुटावर पाणी लागत आहे. काही बोअर तर त्यापेक्षा जास्त खोलू नेहूनही कोरडे जात आहेत.  कोळगाव येथील शेतकरी दिनकर पाटील यांची शेती करमाळ्याला येणाऱ्या रस्त्याच्या बाजूला आहे. गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीच्या जवळच त्यांची शेती असून त्यांनी पाणी समस्या सोडवण्यासाठी शेतात बोअर घेतला. त्याला १८० फुटावर पाणी लागले. त्यानंतर त्यांनी त्यामध्ये मोटार टाकली पण बोअर सुरु असताना जेवढे पाणी लागले तेवढे पाणी पुन्हा वर आले नाही. काहीप्रमाणात पाणी कमी येऊ लागले. बोअरमध्ये मोटार सोडतानाच बोअरमधून आवाज येत असल्याचे कप्पीवाल्याच्या लक्षात आले, असे सांगितले जात आहे. दिनकार पाटील यांचे चिरंजीव म्हणाले, आठ दिवसांपूर्वी बोअर घेतला होता. त्याला पाणी चांगले लागले. त्यामुळे लगेच त्यात मोटार सोडली. मोटार सोडताना त्यातून आवाज येत असल्याचे लक्षात आले. मात्र दोन दिवसांपासून हा आवाज कमी झाला आहे.  बोअरमध्ये मोटार सुरु असून पाणी येत आहे.
या गावातील एक शेतकरी म्हणाले, बोअर घेतल्यानंतर कोणत्याही बोअरमधून सुरुवातील आवाज येतो. मात्र या बोअरमधून प्राण्यांचा, कुत्र्याचे पिल्लू आणि पाणी खळखळण्याचा आवाज येत आहे.

नागरिकांनी घाबरु नये...
सोलापुरातील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक मुश्‍ताक शेख म्हणाले, गुड आवाज येतो, पाणी खळखळण्याचा आवाज येतो हे आतापर्यंत ऐकले आहे. जमनीखाली पाणी असते. ज्याप्रमाणे जमीनीवर पाणी वाहते, तसेच जमीनीखाली असलेले पाणी वाहत असते. त्यामुळे असे प्रकार घडतात. मात्र प्राण्याचा आवाज येत असल्याचे हे पहिल्यांदा ऐकत आहे. हा बोअर किती खोल आहे, पहावे लागेल. नागरिकांनी याला घाबरुन जाण्याचे कारण नाही. जमीनीखाली ज्या हालचाली असतात. त्यामुळे असे प्रकार घडतात. 

भूअंतर्गत हालचालींचा परिणाम
करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील भूगोल अभ्यासक प्रा. उत्तम विटुकडे म्हणाले, जमीनीच्या पृष्ठभागावरील दाबाचा परिणाम भूगर्भातील हालचालींवर होत असतो. त्याचेच हे एक उदाहरण आहे. भूपृष्ठांतगर्त भागात दाब वेगवेगळा असेल तर जास्त दाबाच्या खडकातून पाणी कमी दाबाकडील खडकाकडे जात असते. आणि पाणी जाण्यासाठी असणारी पोकळी अतिशय लहान असेल तर त्या पोकळीतून वेगाने पाणी फेकले जाते. आणि ते पाणी जर एखाद्या खडकावर आदळत असेल तर त्याचा आवाज निर्माण होतो. तोच आवाज बोअरवेलच्या पोकळीतून आपल्याकडे पोहचेपर्यंत अनेक ठिकाणी आदळला जाऊन इको होतो. आणि तो आवाज वेगवेगळ्या स्वरुपामध्ये ऐकायला येतात. डॉ. विजया गायकवाड यांनीही ही भूअंतर्गत हालचालीचा परिणाम असल्याचे सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : मुलुंड येथील क्रीडा संकुलन झालेल्या भ्रष्टाचाराबाबत महाविकास आघाडीचं आंदोलन

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

८ चेंडूंत ६ विकेट्स.. पाच त्रिफळाचीत ! Kishor Kumar Sadhak ने इंग्लंडमध्ये सलग दोन षटकांत घेतल्या दोन Hat-Tricks

Parenting tips: पेराल ते उगवेल, आई वडिलांकडून अशा प्रकारे सवयी शिकतात मुलं

SCROLL FOR NEXT