vijayraj dongre 
सोलापूर

सभापती विजयराज डोंगरे भडकले, माहिती नसेल तर बैठकीला येता कशाला म्हणाले 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीची मासिक सभा आज शिवरत्न सभागृहात झाली. या बैठकीमध्ये समितीच्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांवर अधिकाऱ्यांना माहिती देता आली नाही. या बैठकीसाठी जिल्हा परिषदेतील विभाग प्रमुखांनी उपस्थित राहणे अपेक्षित असताना विभाग प्रमुखांनी बैठकीकडे पाठ फिरविली. जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभाग, ग्रामपंचायत विभाग आणि आरोग्य विभागाच्या विभाग प्रमुखांनी या बैठकीला दांडी मारत आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बैठकीसाठी पाठवून दिले.

या बैठकीत सदस्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांवर भांबावून गेलेल्या कर्मचारी प्रतिनिधींनी या बैठकीत फक्त बघ्याचीच भूमिका घेतली. काही प्रतिनिधींनी अर्धवट माहितीवर अर्धवट उत्तरे दिली. त्यामुळे सभापती डोंगरे आणि सदस्यांचा संताप वाढला.  या बैठकीत सदस्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांची माहितीच जर तुम्हाला बैठकीत सांगता येत नसेल तर तुम्ही बैठकीला येता कशाला? असा सवालच अर्थ समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांनी या कर्मचाऱ्यांना विचारला. बैठकीत विचारलेल्या प्रश्‍नांवर मिळत असलेल्या उत्तरांना पाहून समितीचे सदस्य वसंत देशमुख यांनी निषेध करून सभेतून बाहेर पडण्याची भूमिका घेतली.

यापूर्वी 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या अर्थ समितीच्या बैठकीत सदस्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांची माहिती देण्यास कर्मचारी, अधिकारी अपयशी ठरले. सदस्य देशमुख यांनी हायमास्ट दिव्याचा प्रश्‍न मागील बैठकीत उपस्थित केला होता. हायमास्ट दिवे 24 तास चालू असतात का? त्यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्‍नावर बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी 15 दिवसात माहिती मागवून देतो असे उत्तर आजच्या बैठकीत दिले. 

जिल्ह्यात किती हायमास्ट बसविण्यात आले आहेत असाही प्रश्‍न सदस्य देशमुख यांनी या बैठकीत विचारला. हे हायमास्ट राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने बसविल्याचे उत्तर दिल्याने जिल्हा परिषद सदस्य वसंत देशमुख चांगले संतापले. आम्ही चार चार टर्म झेडपी सदस्य, पंचायत समिती सदस्य म्हणून काम केले आहे, आणि तुम्ही आम्हाला अशी उत्तरे देता? आम्हाला वेड्यात काढण्याचा प्रयत्न करता? असा सवाल त्यांनी या बैठकीत उपस्थित केला. आजच्या बैठकीला श्रीमंत थोरात व अंजनादेवी पाटील यांनी देखील प्रश्‍न उपस्थित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026 Wishes in Marathi: "गजानना श्री गणराया..." गणेश चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा गणेशभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

टीम इंडियाने नक्वींकडून आशिया कपची ट्रॉफी का घेतली नाही? BCCIने सांगितलं कारण

Ganesh Chaturthi 2026: गणेशभक्तांनो, मुहूर्ताची वेळ लक्षात ठेवा! पहाटे ४.५० ते दुपारी १.५१ पर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना

Bombay High Court: ‘स्मोकिंग तंबाखू’ खाद्यपदार्थ नाही; एफएसएस कायद्यानुसार कारवाई करता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi News Live Updates : कसबा गणपती मंदिरासमोर ढोल-ताशांचा गजर; ‘भेसळ रोखा’चे फ्लेक्स लक्षवेधी

SCROLL FOR NEXT