harina.jpg 1.jpg 
सोलापूर

प्राण्यांना कोरोना व्हायरसची लागण होऊ नये म्हणून....

प्रशांत देशपांडे

सोलापूर : शहरातील महात्मा गांधी प्राणी संग्रहालयात कोरोना व्हायरस पार्श्‍वभूमीवर संग्रहालयातील प्राण्यांना कोरोना व्हायरसची लागण होऊ नये याकरिता प्राणी संग्रहालय परिसरात सॅनिटायझरची फवारणी, तसेच आवश्‍यक तेथे जाळीचा उपयोग केला आहे. उन्हाळ्याचा प्राण्यांना त्रास होऊ याकरिता कुलरची सोय केली आहे. 

महात्मा गांधी प्राणी संग्रहालयात कोरोना व्हायरस पार्श्‍वभूमीवर कर्मचाऱ्यांना मास्क आणि हॅन्डग्लोज लावून काम करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, प्राणी संग्रहालयात कर्मचाऱ्यांनी प्रवेश केल्यानंतर सुरवातीला त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते. तसेच, प्राण्यांना कोरोना व्हायरसची लागण होऊ नये याकरिता अन्न पदार्थ देताना गरम पाण्यात उकळून देण्यात येतात. तसेच जे प्राणी पालेभाजी खातात त्यांना भाज्या गरम पाण्याने धुवून वाळवून खाण्यास देत आहेत. प्राण्यांची आरोग्य तपासणी केली आहे. उन्हाळा पार्श्‍वभूमीवर प्रत्येक प्राण्यांच्या पिंजऱ्यासमोर कुलर ठेवले आहेत. 

उन्हाचा त्रास प्राण्यांना जाणवणार नाही याची काळजी घेत आहेत. सध्या प्राणी संग्रहालयात तीन बिबटे आहेत. बिबट्यांचा पिंजरा मोठा हवेशीर असून तेथे कुलरची व्यवस्था केली आहे. सगळ्या प्राण्यांचे आरोग्य उत्तम असून कोणत्याही प्राण्याला सर्दी, खोकला, ताप नाही. मात्र, खबदारीचा उपाय म्हणून यंत्रणा सज्ज ठेवली आहे. कोरोना व्हायरस पार्श्‍वभूमीवर 17 एप्रिलपासून प्राणी संग्रहालय नागरिकांसाठी बंद ठेवले आहे. लॉकडाउन संपेपर्यंत तसेच पुढील आदेश येईपर्यंत प्राणी संग्रहालय नागरिकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. 

कर्मचाऱ्यांना मास्क आणि हॉन्डग्लोजची सक्ती 
प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी संग्रहालयाचा संपूर्ण परिसरात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली आहे. तसेच, कर्मचाऱ्यांना हॉन्डग्लोज आणि मास्क वापरण्यास सक्ती केली आहे. प्राण्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. 
- डॉ. नितीन गोटे, संचालक, महात्मा गांधी प्राणी संग्रहालय 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISRO Cyclone Warning: माॅन्सूनच्या परतीनंतर चक्रीवादळांचा धोका: ‘इस्रो’चा इशारा; ४४ वर्षांतील मोठा तडाखा शक्य

ढिंग टांग : आमचे संचित..!

Amit Shah: समान नागरी कायद्याचा निर्धार: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा; तीन वर्षांत ‘एनडीए’शासित राज्यांत अंमलबजावणी

शेअर बाजार : ‘एनएसई’चा आयपीओ!

अर्थबोध : ‘ब्रिक्स’ची डिजिटल चाल, रुपयाला नवी ताकद!

SCROLL FOR NEXT