crime sakal
सोलापूर

सासरच्या त्रासामुळेच ‘ती’ची चिमुकलींसह आत्महत्या

मयताच्या आईची पोलिसांत धाव; संशयितांना दोन दिवसांची पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सासरकडील लोकांच्या त्रासाला कंटाळून शेततळ्यात उडी मारून सारिका अक्षय ढेकळे यांनी दोन चिमुकलींसह आत्महत्या केल्याची बाब पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पती अक्षय ढेकळे, सासरा उत्तम मच्छिंद्र ढेकळे व दीर अण्णासाहेब उत्तम ढेकळे (सर्वजण रा. पाथरी, ता. उत्तर सोलापूर) यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.

विवाहात मानपान केला नाही, चांगला आहेर केला नाही, सोने दिले नाही याचा राग मनात धरून पतीसह कुटुंबातील व्यक्‍तींनी वारंवार अपमान केला. नवीन कपडे घेऊन न देणे, उपाशी ठेवणे, माहेरी न पाठविणे, फोनवर माहेरी बोलू न देणे अशा बाबींना कंटाळून सारिका हिने तिच्या दोन्ही मुलींसह आपले जीवन संपवले. सुरवातीला मयताच्या पतीने शेतात पाखरे राखायला गेल्यानंतर त्यांचा पाय घसरून शेततळ्यात पडल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले होते. त्या तिघींचा मृत्यू संशयास्पद वाटल्याने सखोल तपास सुरू केला होता.

सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक डी. एस. दळवी यांनी त्यासंबंधीची चौकशी केली. तत्पूर्वी, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली होती. सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण फुगे यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे. त्यानंतर मयताचा पती अक्षय उर्फ आकाश ढेकळे, सासरा उत्तम मच्छिंद्र ढेकळे, अनिता उत्तम ढेकळे, अण्णासाहेब उत्तम ढेकळे, पूजा अण्णासाहेब ढेकळे, विलास सुरवसे, सोजरबाई विलास सुरवसे, साळुबाई बाळा गुंड, बाळा गुंड आणि छकुली यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला. त्यातील पती, सासरा व दिराला दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. यामध्ये संशयित आरोपींतर्फे ॲड. प्रशांत नवगिरे, ॲड. श्रीपाद देशक यांनी तर सरकारतर्फे ॲड. बनसोडे यांनी काम पाहिले.

दोन्ही मुली झाल्याने अपमानास्पद वागणूक

संशयित आरोपींना न्यायालयासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते. सारिका ढेकळे यांना सलग दोन मुलीच झाल्याने सासरच्यांनी त्यांचा छळ सुरु केला होता, ही माहिती समोर आली आहे. अन्य आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. मयत सारिकाच्या सासरच्यांनी तिला दोन मुलीच झाल्याने त्रास द्यायला सुरू केला होता. मयताची आई त्यांचा कौटुंबिक वाद मिटवायला शुक्रवारी (ता. २१) मुलीच्या सासरी आल्या होत्या. त्या त्यांच्या गावी गेल्यानंतर काही वेळातच सारिकाने दोन्ही मुलींसह आत्महत्या केली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Prices Fall : सणासुदीच्या दिवसांत सामान्यांना मोठा दिलासा; देशभरात साखरेच्या किरकोळ दरात मोठी घट

Class One Sports Officer: माळशिरसचा रुद्रांक्ष ठरला पहिला! क्रीडा अधिकारीपदी ‘क्लास वन’ निवड होण्याचा मान; नेमबाजीत ऐतिहासिक कामगिरी

Kalyan Latur Expressway : माळशेज घाटात होणार 8 किलोमीटर लांबीचा बोगदा; 35 हजार कोटींच्या 'जनकल्याण एक्सप्रेसवे'ला सरकारची मान्यता, नव्या महामार्गाची काय वैशिष्ट्ये?

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

Gold Rate Today: गणेश चतुर्थीला सोनं स्वस्त! तब्बल 10 हजारांनी घसरण, आजचा ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT