ST bus attention on freight the first bus from Kurduwadi depot left with vegetables 
सोलापूर

लालपरीचे मालवाहतुकीवर लक्ष; कुर्डुवाडी आगाराची पहिली बस तरकारी घेऊन रवाना 

विजयकुमार कन्हेरे

कुर्डुवाडी (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रवासी वाहतुकीला मिळणारा अत्यल्प प्रतिसाद पाहता लालपरीने मालवाहतुकीवर लक्ष केंद्रीत केले असून कुर्डुवाडी आगाराची पहिली मालवाहतूक बस तरकारी घेऊन आज रवाना झाली. 
कोरोना संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुमारे दोन महिने बससेवा बंद होती. काही दिवसांपूर्वी 22 तारखेपासून कुर्डुवाडी आगारातून बार्शी, करमाळा, पंढरपूर या ठिकाणी बससेवा सुरू करण्यात आली. परंतु प्रवासीच नसल्याने ही वाहतूक परवडेनाशी झाली. एका गाडीत सोशल डिस्टन्सिंग पाळून 21 प्रवासी बसू शकतात. परंतु एका गाडीत प्रवाशांची दोन अंकी संख्याही झाली नाही. पंढरपूर येथील फेऱ्या गेल्या तीन दिवसांपासून बंद करण्यात आल्या होत्या. तर करमाळा व बार्शी येथील फेऱ्याही आता बंद करण्यात आल्या. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाच्या वतीने मालवाहतुकीचा आधार घेतला जात आहे. कुर्डुवाडी आगार व्यवस्थापक मिथुन राठोड म्हणाले, कुर्डुवाडी आगारात एक मालवाहतूक बस आहे. डिव्हिजन वर्कशॉपमधून तीन मालवाहतूक बस येणार आहेत. मी शहरातील किराणा व्यापारी, फळे, भाजी व्यापारी यांच्याशी मालवाहतूक सुरू करण्याबाबत सकारात्मक संपर्क केला आहे. या गाडीसाठी प्रति किमी 28 रुपये भाडे आकारले जाणार असून त्यावर 18 टक्के जीएसटी असेल. कमीतकमी तीन हजार रुपये भाडे असेल. यात आठ टन माल वाहून नेता येईल. आज पहिली मालवाहतूक गाडी तरकारी घेऊन कल्याणकडे रवाना झाली. यासाठी सचिन चव्हाण यांनी चालक म्हणून सेवा दिली. प्रवाशांनी पाठ फिरवली तरी आर्थिक संकटाशी सामना करताना मालवाहतुकीचा चांगला प्रयत्न होताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

सुरू होऊन ८ महिने नाही झाले तोच निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका? मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चेला उधाण

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

Tata Sons Boardroom: बोर्डरूममध्ये टाटा सन्सचे ‘बंड’; सूत्रे पुन्हा चंद्रशेखरन यांच्याकडे, नोएल टाटांची नाराजी कायम

Agriculture Corruption: कृषी खात्यामध्ये भ्रष्टाचाराचे उदंड ‘पीक’; राज्यात १६५ अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT