ST bus decision of regarding Corona 
सोलापूर

मोठी बातमी : कोरोनाबाबत एसटी महामंडळाने घेतला हा निर्णय

सुस्मिता वडतिले

सोलापूर : "कोरोना"च संसर्ग थांबण्यासाठी सरकार वेगवेगळे उपाययोजना करत आहेत. त्यातच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता एसटीत प्रवास करताना एका सीटवर एकच प्रवासी बसून प्रवास करणार आहे, अशा सूचना प्रत्येक बस स्थानकावर प्रवासी आणि चालक-वाहकांना देण्यात आले आहे.
जगभर थैमान घातलेल्या "कोरोना" व्हायरस ने महाराष्ट्रात हात-पाय पसरले आहे. दररोज कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. हा विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सरकार दररोज वेगवेगळे निर्णय घेत आहेत. त्याला नागरिकांचाही प्रतिसाद मिळत आहे. पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या अनेक एसटी बस व रेल्वे गाड्या रिकाम्या जात आहेत. यातून महामंडळाला तोटा होत आहे. असे असताना सुद्धा नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तोट्यात महामंडळाचे फेऱ्या सुरू आहेत. आता एक एसटी बस मधून फक्त 22 लोकांना प्रवास करता येणार आहे.
 एसटी महामंडळाने प्रवाशांच्या संख्येनुसार पुण्याकडे जाण्याच्या काही गाड्या रद्द केल्या आहेत. तर ज्या गाड्या सोडल्या जात आहेत, याची योग्य खबरदारी घेऊनच गाड्या मार्गस्थ केल्या जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT