ST Bus 
सोलापूर

डिझेल दरवाढ व कोरोना रुग्णवाढीचा परिणाम ! "लालपरी' पुन्हा संकटात

राजाराम माने

केत्तूर (सोलापूर) : कोरोना महामारीचा प्रदुर्भाव काहीअंशी कमी झाल्यानंतर करमाळा एसटी आगाराने ग्रामीण भागासह शहरी भागातील लांब पल्ल्याच्या एसटी बसची सेवाही सुरू केली. ही सेवा सुरळीत होत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील रुग्णसंख्याही रोजच वाढू लागली. यामुळे प्रवासाच्या दृष्टीने एसटी धोकादायक ठरण्याची शक्‍यता असल्याने एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने कमी झाली आहे. 

अनलॉकनंतर प्रथम 50 टक्के क्षमतेवर एसटी बस धावू लागल्या. ग्रामीण भागातील वाहतूकही सुरळीत सुरू झाली होती. एसटीचे प्रवासी पूर्वीप्रमाणेच पुन्हा एसटीकडे वळल्याने प्रवाशांची संख्याही पूर्वीप्रमाणे वाढू लागली. एसटी बसही पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या असतानाच आता पुन्हा एकदा वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे एसटीची प्रवासी संख्या वरचेवर घटत चालली आहे. त्यामुळे अगोदर संकटात असणाऱ्या एसटीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटू लागले आहे. काही मार्गांवर तर एसटी बस रिकाम्याच धावू लागल्या आहेत. त्यामुळे एसटी सेवा तोट्यात चालली आहे. 

ग्रामीण भागातील प्रवाशांची सोय व्हावी या नात्याने तोट्यात असूनही या ठिकाणी सेवा सुरू केली होती. परंतु डिझेल इंधनाचे वरचेवर वाढणारे दर पाहून तोट्यात जाणाऱ्या मार्गावरील एसटी बस सेवा वाढणाऱ्या कोरोना संसर्गामुळे सध्या बंद केल्या आहेत. त्यामुळे सध्या आगाराला दिवसाकाठी दीड लाख रुपयांच्या आसपास उत्पन्नाला फटका बसला आहे. सध्या एसटीची प्रवासी संख्या व उत्पन्नही घटले आहे. 
- अश्विनी किरगत, 
आगार प्रमुख, करमाळा बस स्थानक 

ग्रामीण भागातील एसटी सेवा पुन्हा एकदा बंद झाल्याने आजारी रुग्णांची हेळसांड होत आहे. शहरात उपचाराला जाण्यासाठी खासगी वाहने केल्याशिवाय पर्याय नसल्याने खर्चातही वाढ होत आहे. 
- अशोक शेंडगे, 
केत्तूर रहिवासी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 FULL SCHEDULE: मुंबई इंडियन्सच्या ग्रुपमध्ये लिंबू टिंबू संघ! गतविजेत्या RCB च्या गटात CSK; १०संघाचे वेळापत्रक एका क्लिकवर

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

SCROLL FOR NEXT