ST Employee Sakal
सोलापूर

विलिनीकरण होत नसेल तर स्वेच्छामरणाला परवानगी द्या; ST कर्मचारी

सोलापुरातील 156 ST कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

विजय थोरात

सोलापूर : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे या मागणीसाठी कर्मचारी दोन महिन्यांपासून संपावर आहेत. मात्र राज्य शासन (state Government) याबाबत ठोस निर्णय घेत नसल्यामुळे कामगारांमध्ये असंतोष वाढला आहे. महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी, अन्यथा 156 कर्मचाऱ्यांना स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी सोलापूर आगारातील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. (Solapur Marathi News)

विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी मागील 60 दिवसांपासून संपाचे हत्यार उपसले आहे. सोलापूर विभागातील कर्मचारीही संपावर असल्याने एसटीची चाके थांबलेली आहेत. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी प्रशासनाकडून सोलापूर विभागात खासगी मालकीच्या शिवशाही बस आणल्या गेल्या. यातून सोलापूर, बार्शी आगारातून पुण्याकडे शिवाशाहीच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. प्रवाशांची होणारी गैरसोय काहीअंशी दूर झाली आहे.

गुरुवारी सोलापूर विभागातील सोलापूर, सांगोला, मंगळवेढा, करमाळा, कुर्डुवाडी, बार्शी आगरातून एसटी धावल्या. संपावर तोडगा काढण्यासाठी परिवहनमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याची घोषणा केली. कामावर रुजू होण्याचे आदेश दिले. मात्र, पगारवाढीच्या घोषणेनंतर मोजकेच कर्मचारी कामावर रुजू झाले. उर्वरित कर्मचारी अद्यापही संपावर ठाम आहेत.

एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण होत नाही तोपर्यंत लढा सुरुच राहील असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. तसेच या वैतागलेल्या कर्मचाऱ्यांची आता स्वेच्छा मरणाचीही परवानगी मागितल्याने हा संप आणखी तीव्र होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना मनोज मुदलियार, गणेश सलगर, महादेव हुंडेकरी, स्वाती सुभाष, सुखदेव कुंभार, मतीन जमादार, चंद्रशेखर कोठे, मार्तंड पाटील, महादेव चिंचोळे, संतोष मदरे, नागनाथ शालगर, गंगाधर फुलमाळी, तानाजी भडकुंबे, अतुल लोंढे, संतोष केत आदी उपस्थित होते.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे या मागणीसाठी मागील 60 दिवसांपासून "संप'रुपी दुखवटा सुरु आहे. मात्र प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय होत नाही. जोपर्यंत विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार आहे.

- सुनील भोसले, कर्मचारी

राज्याचे मुख्यमंत्री व प्रशासनाकडून आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना प्रतिसाद मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा मरणाची परवानगी मागत प्रशासनाचे दार ठोठावले आहे.

- मनोज मुदलियार, कर्मचारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

टॅक्सी चालकांना मोठा दिलासा! सहकारी टॅक्सी सेवेसाठी सरकार नवे नियम आणणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले तातडीचे आदेश

Shirur Firing Case : करडे घाटात झालेल्या अंदाधूंद गोळीबार प्रकरणानंतर अलर्ट झालेल्या पोलिस दलाने नामचीन गुंडांची धरपकड केली सुरू

Mumbai: पूरमुक्त मुंबई करणार म्हणणाऱ्या BMCला पहिल्याच पावसात धप्पा, अंधेरी सबवे पाण्यात, VIDEO VIRAL

Panhala Tourism Tax : पन्हाळागडावर पर्यटकांची उघड लूट? पर्यटन कराच्या नावाखाली वर्षाकाठी 5 ते 7 लाखांचा घोळ; 'या' गोष्टीमुळे संशय वाढला!

Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी प्रशासनाचा मोठा प्लॅन! तब्बल 4,500 बसेस धावणार, दररोज 33 लाख भाविक करणार प्रवास

SCROLL FOR NEXT