start of regular work taking estimates from activist schedule of candidates after polling  Sakal
सोलापूर

Solapur News : कार्यकर्त्यांकडून अंदाज घेत नियमित कामांना सुरवात; मतदान संपल्यानंतर उमेदवारांचा दिनक्रम

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरू असलेली उमेदवार, उमेदवारांचे नातेवाईक, कार्यकर्ते यांची धावपळ अखेर मंगळवारी (ता. ७) सायंकाळनंतर थांबली.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरू असलेली उमेदवार, उमेदवारांचे नातेवाईक, कार्यकर्ते यांची धावपळ अखेर मंगळवारी (ता. ७) सायंकाळनंतर थांबली. उमेदवारांनी आज कार्यकर्त्यांकडून मतदारांचा अंदाज घेत नियमित कामांना सुरवात केली. महिनाभरापासून सुरू असलेली दगदग अखेर थांबल्याचे पाहायला मिळाले.

सोलापुरात भाजप महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी आज सोलापुरातील निवास्थानात विश्रांती घेतली. फोनवरून त्यांनी कार्यकर्त्यांकडून मतदानाचा आढावा घेतला. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी भाजप महायुतीचे उमेदवार सातपुते यांचा माळशिरस तालुक्याचा दौराही सुरू होता.

२४ मार्चला त्यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर महिनाभरापासून ते प्रचारात गुंतले होते. माढ्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मतदान संपल्यानंतर अनेक लोक भेटीसाठी आल्याने रात्री एक पर्यंत भेटीगाठी घेतल्या. प्रचाराच्या व्यस्ततेमुळे आठ दिवस व्यवस्थित झोप झालीच नव्हती.

त्यामुळे सकाळी थोडे उशिरा उठून स्नान करून पुन्हा लोकांच्या भेटी घेण्यास सुरवात केली. माढा मतदारसंघातील अनेक गावातून लोक भेटण्यासाठी येत होते. त्यामुळे आज संपूर्ण दिवस आलेल्या लोकांना वेळ देत त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचे काम केले.

प्रचारादरम्यान दररोज सकाळी सात वाजता घरातून बाहेर पडून दिवसभर माढा मतदारसंघातील विविध गावांना भेटी देणे, पदयात्रा, कॉर्नर सभा घेणे, कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणे यामुळे ते रात्री अडीच वाजता घरी येत होते.

सोलापुरातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी आज सकाळी दहा वाजता टाकळी (ता. दक्षिण सोलापूर) येथील शेतात हजेरी लावली. त्या ठिकाणी काही काळ थांबून पुन्हा सोलापुरातील निवासस्थानी त्या आल्या.

त्या ठिकाणी त्यांनी जनता दरबार घेऊन नागरिकांशी संवाद साधला. माढ्यातील महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फोनवरून कार्यकर्त्यांशी, नेत्यांशी संवाद साधला.

प्रणिती शिंदे, ओमराजे राज्यभर प्रचारात?

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे आणखी दोन टप्पे राहिले आहेत. या दोन टप्प्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर व सोलापुरातील काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचे येत्या काळात दौरे व इतर भागात प्रचारसभा होण्याची शक्यता आहे.

राज्यातील सेलिब्रेटी उमेदवार, राज्यभर ओळख असलेले नेते म्हणून खासदार राजेनिंबाळकर व आमदार शिंदे यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या सभा इतर ठिकाणी होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT