Washimbe School. 
सोलापूर

शिक्षण विभागाचा अजब कारभार ! राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त वाशिंबे शाळेला पाच वर्षांपासून मिळेना मुख्याध्यापक 

राजाराम माने

केत्तूर (सोलापूर) : वाशिंबे (ता. करमाळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक पदासाठी पात्र असतानाही मागील पाच वर्षांपासून मुख्याध्यापक पद रिक्त आहे. मुख्याध्यापक पदासाठी विद्यार्थी संख्या 151 असावी लागते. वाशिंबे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थी संख्या 246 असून करमाळा तालुक्‍यातील सर्वांत मोठी पटसंख्या व सर्व भौतिक सुविधा असलेली पहिली ते सातवीपर्यंतची ही जिल्हा परिषदेची शाळा आहे. 

महाराष्ट्र शासनाने मागील आठवड्यात जाहीर केलेल्या आदर्श शाळा उपक्रमात राज्यातील 300 शाळांमध्ये या शाळेची निवड झाली आहे. परंतु ही शाळा मागील पाच वर्षांपासून मुख्याध्यापकाविना सुरू आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. शाळेत विद्यार्थी संख्याही भरपूर आहे, त्यामुळे सहशिक्षकांवर अतिरिक्त कार्यालयीन काम करण्याची वेळ येत आहे. त्याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. शिक्षण विभागाने गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ मुख्याध्यापकाची नेमणूक करावी, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी केली आहे. 

करमाळा पंचायत समिती शिक्षण विभागाकडे मुख्याध्यापक पदाबाबत नवीन नियुक्तीची मागणी केली आहे, तरी मागणीची दखल घेऊन लवकरात लवकर नवीन मुख्याध्यापकाची नियुक्ती करावी, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती, समस्त पालक व ग्रामस्थांतून होत आहे. 

याबाबत पालक सतीश झोळ म्हणाले, राज्यात नावलौकिक मिळवलेल्या या जिल्हा परिषद शाळेत गेल्या पाच वर्षांपासून मुख्याध्यापक पद रिक्त आहे, ही बाबच लाजिरवाणी आहे. शिक्षण विभागाने याची त्वरित दखल घेऊन सदरची नियुक्ती करावी. 

पालक प्रा. जाकीश शेख म्हणाले, कायमस्वरूपी मुख्याध्यापक नसल्यामुळे सहावी आणि सातवीच्या वर्गशिक्षकांकडे प्रभारी मुख्याध्यापक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर मागील पाच वर्षांपासून परिणाम झाला आहे. 

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश पवार म्हणाले, करमाळा पंचायत समिती शिक्षण विभागाकडे वारंवार मुख्याध्यापकपदी नवीन नियुक्तीची मागणी केली आहे, तरी मागणीची दखल घेऊन लवकरात लवकर नवीन मुख्याध्यापकाची नियुक्ती करावी; अन्यथा समस्त ग्रामस्थ व पालक यांच्या वतीने करमाळा तहसीलदार कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करण्यात येईल. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांचा गुढीपाडवा गोड होणार! २००० रुपये खात्यात जमा, २२वा हप्ता देत पंतप्रधानांचे मोठं वक्तव्य

बिग बॉस नंतर आयुष संजीवची नवी इनींग ! 'या' गाण्याचं केलं दिग्दर्शन आणि कोरियोग्राफी

Fridge Vastu Tips: फ्रिजच्यावर 'या' 3 गोष्टी ठेवू नका, अन्यथा निर्माण होतात वास्तुदोष

Latest Marathi News Live Update : सलग तिसऱ्या दिवशी अमरावती ठरलं देशातील सर्वाधिक उष्ण शहर

Akola News: बहिणीच्या विरहात भावाचा जीव गेला; अंत्यसंस्कारानंतरच हृदयविकाराचा झटका

SCROLL FOR NEXT