002Child_Mask_0_2.jpg 
सोलापूर

जिल्ह्यातील 'या' पाच तालुक्‍यांसाठी होणार कठोर निर्णय ! 20 दिवसांत वाढले दीड हजार रुग्ण

तात्या लांडगे

सोलापूर : शहर-जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली असून मृतांची वाढलेली संख्या चिंताजनक मानली जात आहे. कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाल्यानंतरही 60 ते 80 वयोगटातील व्यक्‍तीच कोरोनाचे बळी ठरत आहेत. 1 ते 20 मार्च या काळात 11 तालुक्‍यांत एक हजार 914 रुग्ण वाढले असून त्यातील एक हजार 550 रुग्ण बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस आणि पंढरपूर या तालुक्‍यातील आहेत. आगामी काळात रुग्णसंख्या आटोक्‍यात न आल्यास कठोर निर्णय होऊ शकतो, अशी चर्चा जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सुरु झाली आहे.

ठळक बाबी...

  • 1 ते 20 मार्च या काळात जिल्ह्यात वाढले एक हजार 914 रुग्ण
  • मागील 20 दिवसांत ग्रामीणमधील 24 जणांचा कोरोनाने घेतला बळी
  • बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस, पंढरपूर या तालुक्‍यांत रुग्णसंख्या वाढली
  • 15 दिवसांत पाच तालुक्‍यांतच वाढले एक हजार 550 रुग्ण
  • नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास त्या तालुक्‍यांसाठी घेतला जाणार कठोर निर्णय

कोरोनामुक्‍त झालेले शहरातील बहुतेक प्रभाग पुन्हा रेड झोनमध्ये गेले आहेत. दुसरीकडे ग्रामीण भागातील रुग्णसंख्या आता दुप्पट, तिप्पट होऊ लागली आहे. आज (शनिवारी) ग्रामीण भागात तब्बल 176 रुग्ण आढळले असून उपळाई रोड (ता. बार्शी) येथील 65 वर्षीय महिलेचा तर मांडवे (ता. माळशिरस) येथील 75 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 1 ते 20 मार्च या काळात बार्शी तालुक्‍यात सर्वाधिक 410 रुग्ण वाढले आहेत. तर करमाळा तालुक्‍यात 320, माळशिरस तालुक्‍यात 286, माढा तालुक्‍यात 276, पंढरपूर तालुक्‍यात 258 रुग्ण वाढले आहेत. तसेच अक्‍कलकोटमध्ये 45, मंगळवेढ्यात 49, मोहोळ तालुक्‍यात 90, सांगोल्यात 88, दक्षिण सोलापूर तालुक्‍यात 38, उत्तर सोलापूर तालुक्‍यात 28 रुग्ण वाढले आहेत. वाढत असलेली रुग्णसंख्या चिंतेत भर टाकणारी असून नागरिकांना सातत्याने नियमांचे पालन करण्याचे आवाहन करूनही त्याचे पालन होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याबाबत काय कठोर निर्णय घेणार, शासनाकडे यासंदर्भातील काय प्रस्ताव पाठविला जाणार, याची उत्सुकता लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 3rd ODI: २-० ने मालिका जिंकली अन् आता टीम इंडियात होणार मोठा फेरबदल? तिसऱ्या वनडेत ‘या’ स्टार्सची एन्ट्री, कोण होणार OUT?

Pune News : पुण्यात २२ तासांत १२३ मुलींचे अपहरण झाल्याचा दावा खोटा; सोशल मीडियावरील ती ‘रील’ निराधार, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

Latest Marathi News Live Update : भारताच्या लेकींनी रचला इतिहास! चीनचा पराभव, ४४ वर्षांनंतर हॉकीत सूवर्णपदक

Custard Apple Season : धारूरचा हंगाम संकटात! दुष्काळाने सीताफळाचा गोडवा हिरावला; मजुरांच्या रोजगारावर होणार परिणाम

Aundha Nagnath Temple : औंढा नागनाथ मंदिर भाविकांसाठी महिनाभर बंद; नित्यपूजा मात्र सुरू राहणार

SCROLL FOR NEXT