msrtc sakal media
सोलापूर

संप महाराष्ट्र एसटीचा; कमाई मात्र कर्नाटक एसटीची

जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा सहभाग; बस बंदमुळे प्रवाशांचे हाल

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : प्रलंबित मागण्यासाठी एसटी कर्माचारी बुधवारी (ता. २७) उपोषणास बसले आहेत. मात्र यावर कोणतीही दखल घेतली नसल्याने अखेर सोलापूर विभागातील नऊ आगारांतील जवळपास चार हजार कर्मचाऱ्यांनी गुरुवारी कामावर न जाण्याचा निर्णय घेतला. या बंदमुळे ऐन दिवाळीत गावी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल पहायला मिळाले. दुसरीकडे, कर्नाटकची एसटी मात्र सुरु होती. त्यामुळे संप महाराष्ट्र एसटीचा आणि गल्ला कर्नाटक एसटीचा अशीच परिस्थिती दिसून आली.

सोलापूर डेपोसह इतर सर्व बसडेपोत एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. सकाळी काही बस सुरु होत्या. मात्र जसजसे उपोषण तीव्र होत गेले, तशी गाड्यांची संख्या कमी होत गेली. पुणे व ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. लांबपल्ल्याचे प्रवासीदेखील रखडले आहेत. त्यामुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांना सोलापूर बसस्थानकात ताटकळत बसून रहावे लागले. बंदमुळे महामंडळाही मोठा आर्थिक फटका बसला. लाखो रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले. यावेळी प्रकाश अवस्थी, मनोज मुदलियार, विशाल भंडारे, प्रशांत गायकवाड आदी पदाधिकारी व कर्मचारी सहभागी होते.

"प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी बुधवारपासून उपोषणास बसले आहेत. मात्र त्यावर तोडगा न निघाल्याaने गुरुवारी कामावर न जाण्याचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला. प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल आम्हालाही खेद आहे."

- श्रीकांत सड्डू, राज्य कार्याध्यक्ष, इंटक

"गुरुवारी एसटी कर्मचारी विविध मागण्यांसाठी उपोषणात सहभागी झाले. त्यामुळे सकाळच्या सत्रात काहीअंशी फेऱ्या झाल्या. मात्र जवळपास ९० टक्‍के फेऱ्या न झाल्याने याचा परिणाम उत्पन्नावर झाला आहे."

- विलास राठोड, विभाग नियंत्रक, सोलापूर

आकडे बोलतात

  • बंदमध्ये सहभागी गाड्या ६९०

  • रद्द झालेल्या फेऱ्या ७६४

  • बुडालेले उत्पन्न २७ लाख २६हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झारखंड विद्यार्थी आंदोलनापुढे सरकार झुकलं! JSSC CGL परीक्षा रद्द; मुख्यमंत्री सोरेन यांची मोठी घोषणा

Karad News : कऱ्हाडचे अमोल होमकर सीआरपीएफचे महानिरीक्षक; संवेदनशील मणिपूर, नागालँडची जबाबदारी

Koregaon News : वडिलांची चित्रकला जपतोय मुलगा! बारावीतील अवधूत साकारतोय अनेक मान्यवरांची हुबेहूब पोर्ट्रेट

Donald Trump: इराणशी गुप्त चर्चेमागे कोण? ट्रम्प प्रशासनाने IRGC पर्यंत कशी पोहोच मिळवली? सीक्रेट कनेक्शन आलं समोर

MPSC Exam : जिद्द अन् परिश्रमातून यश; कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड

SCROLL FOR NEXT