Maharashtra-Police-1-1.jpg 
सोलापूर

मराठा समाजच्या आंदोलनासाठी तगडा बंदोबस्त : सोलापुरात एसआरपीएफसह दंगा प्रतिबंधक, जलद प्रतिसाद पथकाची नियुक्‍ती

सकाळवृत्तसेवा

 सोलापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. उद्या (ता. 21) सोलापूर शहर- जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनास सर्व राजकीय पक्षांसह विविध संघटनांनी पाठींबा दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला जाणार आहे. 

सोलापूर बंदच्या पार्श्‍वभूमीवर रविवारी (ता. 20) पोलिस आयुक्‍तालयात बैठक पार पडली. यावेळी पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी आंदोलकांना शांततेत बंद पाळण्याचे आवाहन केले. याप्रसंगी भाऊसाहेब शेडगे, गणेश डोंगरे, निशांत सावळे, शाम कदम, लहू गायकवाड, चंद्रकांत वानकर, इंद्रजित पवार, प्रा. गणेश देशमुख, पुरुषोत्तम बरडे, ज्ञानेश्‍वर सपाटे, अनंत जाधव, पद्माकर काळे, श्रीकांत डांगे, राजन जाधव, विठ्ठल शिंदे, संजय भोसले, दिनकर जगदाळे, दत्ता मुळे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी बंदला सर्व पक्ष व संघटनांनी पाठिंबा दिल्याचे पोलिस आयुक्‍तांना सांगितले. त्यावेळी कायद्याचा आदर करून आपल्या मागण्या सरकार दरबारी पोहचवा, असे आवाहन केले. 

"असा' असेल पोलिस बंदोबस्त 

  • एसआरपीएफ : एक तुकडी 
  • दंगा प्रतिबंधक पथक : 100 पोलिस 
  • जलद प्रतिसाद पथक : 100 पोलिस 
  • पोलिस : सुमारे 3,000 
  • होमगार्ड : 2,000 हून अधिक 

संपादन : अरविंद मोटे 

महराष्ट्र सोलापूर मराठा समाज आंदोलन 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indore Fire Accident : इमारतीला भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू; इलेक्ट्रिक कार चार्जिंग करताना शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना

Dhangar Community: मेंढपाळ धनगरांसाठी अर्धबंदिस्त मेंढीपालन प्रकल्पाचे संकेत; कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक!

Hasan Mushrif Kolhapur Politics : जिल्हा बँक, गोकुळ, झेडपी, बाजार समिती आणि मंत्रीपद, मुश्रीफांचे ‘सब कुछ कागल’ मग जिल्ह्याला काय

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये बलात्कार प्रकरणातील आरोपी अशोक खरात उर्फ स्वघोषित कॅप्टन अटकेत

Beed Illegal Mining: अवैध खदानीत मृत्यू; पीक विमा उचलून प्रशासनास डल्ला?;ज्ञानेश्वर सावंतच्या खदानीत घोटाळा

SCROLL FOR NEXT