online education 
सोलापूर

ऑनलाइन शिक्षणाला निदान दिवाळीला तरी "ब्रेक' मिळणार का? विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही पडला प्रश्‍न

राजाराम माने

केत्तूर (सोलापूर) : कोरोना महामारीच्या संकटामुळे सर्व काही होत्याचे नव्हते झाले. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून लॉकडाउन सुरू करण्यात आला. लॉकडाऊन हळूहळू वाढतच गेला व सुरू असलेल्या लॉकडाउनचा विद्यार्थी वर्गाला सर्वाधिक फटका बसला. शाळा बंद राहिल्या व त्या अद्यापही बंदच आहेत. शाळा बंद असल्या तरी गेल्या सात- आठ महिन्यांपासून शाळांचे ऑनलाइन वर्ग मात्र घेण्यात येत आहेत. ऑनलाइन वर्ग घेणाऱ्या शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत कोणतीही सुटी मात्र देण्यात आलेली नाही किंवा जाहीर झाली नाही. परिणामी शिक्षक, विद्यार्थी व पालक आता सुटीच्या प्रतीक्षेत आहेत. 

ऑनलाइन शिक्षणाला गणेशोत्सवाची सुटी मिळाली नाही आता कमीत कमी दिवाळी जवळ आली आहे, त्यामुळे दिवाळीची सुटी तरी जाहीर करावी व ती मिळावी, अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून होत आहे. एप्रिलपासून ऑनलाइन वर्ग सुरू झाले तेव्हापासून ऑनलाइन वर्गाला सुटी मात्र जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी वर्ग हा मानसिक दबावाखाली वावरत आहे. 

केत्तूरची विद्यार्थिनी धनश्री खोडवे म्हणाली, शाळा बंद झाल्यापासून आम्ही दररोज मोबाईलवर पाठवलेला अभ्यास करतो. पण सारखा मोबाईल पाहून डोळ्यांना त्रास होतो. त्यामुळे आता आम्हाला दिवाळीची सुटी मिळावी असे वाटते. 

केत्तूर विद्यालयाचे शिक्षक किशोर जाधवर म्हणाले, लॉकडाउन लागल्यापासून जरी शाळांना सुट्या असल्या तरी एकही दिवस विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू दिलेला नाही. ऑनलाइन तास तसेच व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना अभ्यास दिला जातो. आता विद्यार्थीही याला थोडे कंटाळले आहेत. त्यामुळे दिवाळीच्या सणामध्ये काही दिवसांचा "ब्रेक' आवश्‍यक वाटत आहे. 

पोफळज (ता. करमाळा) येथील शिक्षिका रेखा शिंदे-साळुंके म्हणाल्या, बच्चे कंपनीना शाळा बंद असल्याने घरातच अभ्यास करावा लागत आहे. त्यामुळे बाहेर जाऊन खेळता येत नाही. अभ्यास करायचा म्हणून सतत मोबाईलमध्ये व्यस्त राहात आहेत. जे गरीब पालक आहेत त्यांनीही अभ्यासासाठी अँड्रॉइड मोबाईल घेतले आहेत. विद्यार्थ्यांचाही ऑनलाइन शिक्षणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

SCROLL FOR NEXT