सोलापूर

शिल्लक तांदूळ विद्यार्थ्यांना वाटा 

संतोष सिरसट

सोलापूर ः राज्यातील सर्व प्रकारच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शाळा बंद झाल्याने शाळेत येणारी मुलेही बंद झाली. त्यामुळे त्यांना शालेय पोषण आहार दिला जात नाही. तो देण्याच्या संदर्भात शासनाने निर्णय घेतला आहे. मुले जरी शाळेत येत नसली तरी शिल्लक राहिलेला तांदूळ, डाळी व कडधान्य विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. 

राज्यातील शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवल्या आहेत. याशिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर केले आहे. शाळा, अंगणवाड्या बंद केल्याने विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहू लागले आहेत. याबाबत न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पोषण होण्यासाठी त्यांना आहार देणे आवश्‍यक असल्याचे मत न्यायालयाने नोंदविले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शाळा स्तरावर शिल्लक असलेला तांदूळ, डाळी, कडधान्य विद्यार्थ्यांना तसेच हंगामी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. शाळेचे मुख्याध्यापक, पोषण आहाराचे कामकाज पाहणारे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती यांनी तांदूळ, डाळी व कडधान्याचा शिल्लक साठा विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटप करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना वाटण्यात येणाऱ्या वस्तूबाबतची शाळास्तरावर प्रसिद्धी करायची आहे. या वस्तूचे वाटप करताना शाळेत गर्दी होणार नाही, याची दक्षता मुख्याध्यापकांनी घ्यायची आहे. पालक व विद्यार्थ्यांना शाळेत टप्प्याटप्प्याने बोलवावे. दोघांमध्ये एक मीटरचे अंतर ठेवण्यासही सांगितले आहे. विद्यार्थी अथवा पालक आजारी असल्यास त्याच्या वस्तू घरी पोच करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आदेशही शासनाने दिले आहेत. 

शाळा व्यवस्थापन समितीला अधिकार 
शाळेत शिल्लक असलेला तांदूळ, डाळी, कडधान्य वाटपाचा निर्णय घेण्याचे अधिकार शालेय व्यवस्थापन समितीला दिले आहेत. वाटप करण्यापूर्वी त्याची माहिती जिल्हाधिकारी व पोलिस यंत्रणेला देण्याच्या सूचनाही शासनाने दिल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT