सोलापूर

उच्च शिक्षणासाठी दिल्लीत गेलेले विद्यार्थी सोलापुरात परतले (VIDEO)

विजयकुमार सोनवणे

 सोलापूर : उच्च शिक्षणासाठी दिल्लीत गेलेले विद्यार्थी सोमवारी सकाळी विशेष एसटीने पुण्याहून सोलापुरात पोचले. या विद्यार्थ्यांनी दिल्ली ते पुणे असा प्रवास रेल्वेने केला होता. रेल्वे प्रवासादरम्यान मोठ्या प्रमाणात असुविधा असल्याच्या तक्रारी या विद्यार्थ्यांनी मांडल्या. 

सोलापूर एसटी स्थानकावर उतरल्यावर या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले व त्यांच्या घरी सोडण्यात आले. या विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी एसटी स्थानकावर महापालिका आणि जिल्हा प्रशासनाचे पथक उपस्थित होते. थर्मल स्क्रीनद्वारे सर्व विद्यार्थ्यांचे स्क्रिनिंग करण्यात आले. त्यानंतर त्यांना आपापल्या घरी जाण्यास परवानगी देण्यात आली. 

यावेळी काही विद्यार्थ्यांनी दिल्ली ते सोलापूरपर्यंतच्या प्रवासादरम्यानचे अनुभव सांगितले. रेल्वेमध्ये पुरेशा सुविधा नव्हत्या. एकाच बाकड्यावर तीन-तीन विद्यार्थ्यांना बसावे लागले. बोगीमध्ये पाणी नव्हते, त्यामुळेही त्रास झाला. दोन बोगीदरम्यान असलेला दरवाजा बंद करण्यात आला होता. त्यामुळे चालत्या रेल्वेत डबेही बदलता आले नाहीत. दरम्यानच्या कालावधीत एका स्टेशनवर गाडी थांबवून विद्यार्थ्यांसाठी जागा करण्यात आली, असा अनुभव एका विद्यार्थिनीने सांगितला. 

विशेष रेल्वेची व्यवस्था केली होती. मात्र प्रशासनात समन्वय नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास वेदनादायी झाला. जेवणाचीही आबाळ झाली. प्रशासनामध्ये समन्वय असता तर विद्यार्थ्यांना त्रास झाला नसता, असाही अनुभव काही विद्यार्थ्यांनी सांगितला. तर पुण्यात उतरल्यावर विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी त्याठिकाणी पथक उपलब्ध होते, तसे सोलापुरात अनुभव आला नाही, असेही काही विद्यार्थ्यांनी सांगितले. 

दिल्लीत गेलेले विद्यार्थी सोलापुरात परतले (VIDEO)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026 Wishes in Marathi: "गजानना श्री गणराया..." गणेश चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा गणेशभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

टीम इंडियाने नक्वींकडून आशिया कपची ट्रॉफी का घेतली नाही? BCCIने सांगितलं कारण

Ganesh Chaturthi 2026: गणेशभक्तांनो, मुहूर्ताची वेळ लक्षात ठेवा! पहाटे ४.५० ते दुपारी १.५१ पर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना

Bombay High Court: ‘स्मोकिंग तंबाखू’ खाद्यपदार्थ नाही; एफएसएस कायद्यानुसार कारवाई करता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi News Live Updates : कसबा गणपती मंदिरासमोर ढोल-ताशांचा गजर; ‘भेसळ रोखा’चे फ्लेक्स लक्षवेधी

SCROLL FOR NEXT