Mukne
Mukne 
सोलापूर

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गावकुसातला पोरगा झाला सौदे अरेबियाच्या कंपनीत मुख्याधिकारी 

किरण चव्हाण

माढा (सोलापूर) : निमगाव (माढा) येथील बाबासाहेब मुकणे यांनी प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत शिक्षण घेत, सौदी अरेबिया येथील कंपनीत मुख्याधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे. सोलर एनर्जीतील योगदानाबद्दल श्री. मुकणे यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 

निमगाव (माढा) सारख्या ग्रामीण भागात शिक्षण घेतलेल्या बाबासाहेब गणपत मुकणे यांनी प्रभावशाली लीडर्सचे दोन पुरस्कार मिळवत किंगडम ऑफ सौदी अरेबिया येथील अभाग एनर्जी लिमिटेड कंपनीत मुख्याधिकारी पदावर झेप घेतली आहे. ग्रामीण भागात शिक्षण होऊनही आंतरराष्ट्रीय पातळीवर सोलर एनर्जीमध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. 

प्रतिकूल परिस्थितीबरोबरच वयाच्या दहाव्या वर्षी आईचे छत्र हरपलेल्या श्री. मुकणे यांनी निमगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत तर माध्यमिक शिक्षण दारफळ येथील नवभारत विद्यालयात घेतले. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे कोल्हापूर विद्यापीठात कमवा व शिका योजनेतून भौतिकशास्त्राचे पदवीचे शिक्षण घेतले. नंतर पुणे विद्यापीठात मास्टर ऑफ टेक्‍नॉलॉजी एनर्जीचे तसेच भौतिकशास्त्र व ऊर्जा अशा दोन विषयांत पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे. काही वर्षे भारतात नोकरी केल्यानंतर श्री. मुकणे यांनी 2019 मध्ये सौदी अरेबियामधील अभाग एनर्जी लिमिटेड कंपनीत नोकरी मिळवली. सध्या ते कंपनीत मुख्याधिकारी म्हणून काम पाहात आहेत. 

श्री. मुकणे यांनी एनर्जी आणि कार्यक्षमता, सुरक्षित व परवडणारे क्‍लीन एनर्जी प्रकल्प विकसित केले. दूरदर्शी एनर्जी तज्ज्ञ तसेच सौर फोटोव्होल्टिक, ऊर्जा कार्यक्षमता एनर्जी ऑडिट व व्यवस्थापन यात बारा वर्षांचा बेंचमेर्किंगचा अनुभव प्रकल्प नियोजन व व्यवस्थापन असे लक्षावधी रुपयांचे एनर्जी प्रकल्प मार्गी लावले आहेत. सौर एनर्जी प्रकल्पांच्या कामाबाबत श्री. मुकणे यांना सर्वाधिक पन्नास प्रभावशाली सौर एनर्जी लीडर्स व ग्रीन लीडर्स अर्थात ग्लोबल लास्टिंग असे दोन जागतिक दर्जाच्या पुरस्कारांसह दहा पुरस्कार मिळाले आहेत. भारतामध्ये कृषीसह इतर अनेक क्षेत्रांत सोलर एनर्जीला भरपूर वाव असल्याचे श्री. मुकणे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT