sutkar bandhu solapur
sutkar bandhu solapur 
सोलापूर

ब्रदर्स डे ः तो बंधू आहे म्हणुनि...सुतकर बंधूंची यशोगाथा

सुस्मिता वडतिले

सोलापूर ः भावा-बहिणीचं नातं हे सगळ्यांपेक्षा वेगळं आणि प्रेमळ नातं समजलं जातं. यामध्ये एकमेकांसाठी प्रेम असतं पण त्याचबरोबर धमालमस्ती आणि प्रेमळ रागही सोबत असतं. आज 'हॅप्पी ब्रदर्स डे' निमित्त सोलापुरातील सुबोध सुतकर आणि पकंज सुतकर या बंधूसोबत 'सकाळ'ने साधलेला संवाद.

सुबोध आणि पंकज यांच्या दोघांमध्ये पाच ते सहा वर्षाचे अंतर आहे. सुबोध यांचे शिक्षण एम.ए, बी.एड, बी.एस.एम. झाले आहे तर पंकज यांचे शिक्षण एम.टेक, बी.एड, एम.ए., पी.एचडी सध्या सुरू आहे. यांच्या आई-वडिलांनी मिळून संजय गांधी नगर , २ नंबर झोपडपट्टी परिसरात १९८२ ला इंग्लिश मीडियम आणि १९८६ ला मराठी माध्यमाची शाळा सुरु केली. यांच्या आई वडिलांनी दारो-दार फिरून मुलींना गोळा करुन  शिक्षणाच्या प्रवाहात आणले.

अशी घडली शाळा

सुरवातीला शाळेमध्ये तुरकटाच्या झोपडीपासून, वीट व मातीचे बांधकाम, त्यावर गंजलेले छिद्र असलेले पत्रे, त्यातच खाली फरशा नसलेले छोटे वर्ग आणि त्यानंतर हळूहळू सिमेंट विटाचे बांधकाम, नवे पत्रे, बसायला फरशी असे रूप होते. शाळेला जागा कमी होती, त्यासाठी शाळेसमोरील एक जुना वाडा कर्ज काढून त्यांनी विकत घेतला. त्या वाड्याच्या ठिकाणी वर्गखोल्या आणि मैदान शाळेसाठी जोडण्यात आले. हळूहळू शाळा मोठी होत गेली. कुणाचीही मदत न घेता २००६ ला महाविद्यालय उभे केले. आता दोन प्रशस्त आरसीसी इमारती, त्यामध्ये २४ वर्गखोल्या बांधलेल्या आहेत.

झोपडपट्ट्ीतील मुलांसाठी...

त्या शाळेचे रुपांतर आपण महाविद्यालयमध्ये करावे. असे स्वप्न सुबोध आणि पंकज या दोघाभावांचे होते. हे स्वप्न साकार करण्यासाठी या दोघांना त्यांच्या आईवडिलांचे मोठे सहकार्य लाभले. म्हणजेच लहान रोपाचे रूपांतर वटवृक्षात केले. यांच्या संकुलाचे नाव 'सम्राट अशोक शिक्षण संकुल' आहे. याठिकाणी पहिली ते पदवीपर्यंतचे शिक्षण सुरू असून कला, वाणिज्य आणि शास्त्रचे शिक्षण विद्यार्थी घेत आहेत. झोपडपट्टी भागातील विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांचे हातावरील पोट असल्यामुळे 'ना नफा ना तोटा' या उद्देशाने सुतकर बंधू महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. सध्या याठिकाणी सुबोध सुतकर यशोधरा ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य तर पंकज सुतकर यशोधरा महाविद्यालयाचे प्राध्यापक म्हणून काम करत आहे. यांच्या संकुलात दिवसेंदिवस विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत चाललेली आहे. या दोघांचे असे स्वप्न आहे की, झोपडपट्टी भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे आणि आपले विद्यार्थी उच्चशिक्षित झाले पाहिजे.  संपूर्ण शैक्षणिक संकुल अद्ययावत ठेवून आई-वडिलांनी घालून दिलेल्या आदर्शाने जास्तीत जास्त शैक्षणिक संधी झोपडपट्टी परिसरात आणणे हे स्वप्न साकारण्यासाठी दोघे बंधू काम करत आहेत.

श्रीराम-लक्ष्मणासारखं बंधूप्रेम

सुबोध आणि पंकज लहानपणापासून ते आजपर्यंत एकमेकांना विचारल्याशिवाय कोणतेही निर्णय घेत नाहीत. नेहमीच चांगल्या आणि वाईट परिस्थितीमध्ये एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. काळजाच्या तुकड्याप्रमाणे एकमेकांची काळजी घेत असतात. परिस्थिती कशीही असो यांच्यामधील प्रेम आणि भांडणांमध्ये अजिबात बदल होत नाही. श्रीराम लक्ष्मण यांचे बंधू प्रेम कसे त्याच पद्धतीने सुबोध आणि पंकज यांचे बंधुप्रेम आजही आहे.

अजून खूप करायचंय

यावेळी या विषयवार बोलताना छोटे बंधू पंकज म्हणाले की, मी माझ्या भावाला एवढंच सांगेन की "अजून आपल्या दोघांना मिळून खूप काही करून दाखवायचं आहे. जितकं आधुनिक शिक्षण आणता येईल तितकं झोपडपट्टी परिसरात आणले पाहिजे. या परिसरात पण हुशार मुले आहे फक्त त्यांना संधी मिळाली पाहिजे हे सगळ्या लोकांना जाणून देऊयात."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT