Dr. Andhare 
सोलापूर

कन्वेअर बेल्टमध्ये अडकून मुलाची फाटली निम्मी छाती ! ही अवस्था पाहून डॉक्‍टरांनी...

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : आजकाल झालेल्या वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिकतेमुळे व विविध तंत्रज्ञानामुळे डॉक्‍टरांनी अनेक असाध्य आजारांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून रुग्णांना जीवदान दिल्याच्या घटना आपल्याला पाहायला व ऐकायला मिळतात. अशीच एक घटना सोलापुरात घडली असून, अपघातात निम्मी छाती कापली गेलेल्या 14 वर्षांच्या मुलावर इमर्जन्सी ऑपरेशन करून डॉक्‍टरांनी त्याला जीवदान दिले. डॉ. विजय अंधारे यांच्या कार्यामुळे "देव तारी त्याला कोण मारी?' याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.  

21 मार्च रोजी देवीचामाळ (करमाळा) येथील एका फॅक्‍टरीमध्ये एका 14 वर्षांच्या मुलाचा कन्वेअर बेल्टमध्ये अडकून अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता, की मुलाची पूर्ण डावी छाती कापली गेली. छाती कापली गेल्यानंतर दिसणारे दृश्‍य तर अत्यंत विदारक होते. पेशंटचे फुफ्फुस बंद अवस्थेत उघडे पडले होते. छातीतील सर्व स्नायू कट झालेले होते आणि आत असलेले हृदयही पंप होत असताना किंवा ठोके पडत असताना उघड्या डोळ्याने दिसत होते... 

हा पेशंट अत्यंत सिरिअस कंडिशनमध्ये सीएनएस हॉस्पिटल या ठिकाणी अत्यावश्‍यक विभागामध्ये प्राथमिक उपचार श्वास घेता येत नसल्याने श्वासाची नळी टाकून तत्परतेने या पेशंटला श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयामध्ये हृदय फुफ्फुस शल्य विशारद डॉ. विजय अंधारे यांच्याकडे इमर्जन्सी म्हणून आला. या पेशंटला दुपारी एक ते दीडच्या सुमारास सर्व ऑपरेशनची टीम तयार करून लगेच जसा पेशंट रुग्णालयामध्ये आला, तसा डायरेक्‍ट हृदय शस्त्रक्रिया विभागामध्ये शिफ्ट करण्यात आला. ऑपरेशन थिएटरमध्ये घेण्यात आला. 

अशी झाली ऑपरेशनची सुरवात 
पेशंट ज्या वेळेस रुग्णालयामध्ये पोचला होता तेव्हा तो बेशुद्धावस्थेत होता. त्याच्या तोंडामध्ये श्वासाची नळी टाकली होती. व्हेंटिलेटरला पेशंट जोडून भुलेखाली जखमेची पूर्ण तपासणी केली गेली आणि ऑपरेशनसाठी तयारी केली. पेशंटच्या छातीमध्ये फुफ्फुस बंद पडले होते, ते व्हेंटिलेट करून फुगवण्यात आले. फुफ्फुसातून जी हवा लिक होत होती ती बंद करण्यात आली. हृदयाचे आवरण दिसत होते, हृदयाच्या ज्या नसा असतात त्याही सगळ्या उघड्या पडलेल्या होत्या आणि त्याच्या छोट्या छोट्या फांद्या होत्या त्यातून रक्त जात होते, ते सर्व बंद करण्यात आले. 

त्यानंतर छातीची हाडे मोडली होती ती एकमेकांच्या जवळ आणून फिक्‍स करण्यात आली आणि त्यांच्या वर स्नायू बंद करण्यात आले, स्नायू सगळे उघडे पडल्यामुळे माती, धूळ जाऊन खूपच खराब झाले होते. काही स्नायू काळे पडले होते, ते सगळे स्नायू स्वच्छ करून, ज्या स्नायूंचा जीव गेला होता ते स्नायू कट करून बाकीचे हृदय आणि फुफ्फुसावर कव्हर करण्यात आले. रिकन्स्ट्रक्‍शन छाती बंद करण्यात आली. अत्यंत अत्यवस्थ असलेला हा पेशंट ज्याला श्वास घ्यायलाही खूप त्रास होत होता, तो ऑपरेशननंतर एका तासामध्ये शुद्धीवर आला. त्याच्या तोंडातून श्वासाची नळी काढण्यात आली. तो पेशंट स्वतः पूर्णपणे श्वास घेऊ लागला. अवघ्या दोन दिवसांनंतर पेशंट आयसीयूमधून जनरल विभागामध्ये शिफ्ट करण्यात आला. आता पेशंट कंडिशनमध्ये आहे. 

या ऑपरेशनला भूलतज्ज्ञ मंजुनाथ डफळे तसेच सहकारी ममता मुनगापाटील, मुबिना शेख, नजमा शेख, केशव मेरगू, बालकृृष्णा कोटा, दिव्या मडता, सुमीत माने, नागमणी मडता यांचे सहकार्य मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bima Yojana: आशा सेविका, कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! राज्य कर्मचारी विमा योजनेचा लाभ मिळणार; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

IND vs IRE 1st T20I: श्रेयस अय्यरने कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात रोहित शर्माचे दोन विक्रम मोडले; आयर्लंडला गोलंदाजांनी रडवले

MPSC Group C Online Exam Protest: एमपीएससी गट-क ऑनलाइन परीक्षेला विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध; फडणवीसांचे चर्चेनंतरच अंतिम निर्णयाचे आश्वासन

Latest Marathi News Live Update : नाशिक सायबर पोलिसांची कारवाई, ऑनलाइन बेटिंग चालवणाऱ्या पाच आरोपींना केली अटक

ENG vs NZ 3rd Test: बेन स्टोक्सचा भीमपराक्रम! जॅक कॅलिसनंतर जगात असा विक्रम नोंदवणारा तोच; इंग्लंडच्या कर्णधाराने केली हवा...

SCROLL FOR NEXT