सोलापूर

महाराष्ट्रातील साखर उत्पादनात चिंताजनक घट 

प्रदीप बोरावके

माळीनगर (ता. माळशिरस, जि. सोलापूर) : यंदाच्या गाळप हंगामात 31 जानेवारी 2020 अखेर देशात 141 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गतवर्षी या कालावधीत देशात 185.59 लाख टन साखर उत्पादन झाले होते. त्या तुलनेत यंदाच्या उत्पादनात 24 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. चालू हंगामात देशात 260 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) व्यक्त केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ते 70 लाख टनांनी कमी असेल, असे 'इस्मा'ने म्हटले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील साखर उत्पादनात यंदा निम्म्याने घट झाली आहे. 

महाराष्ट्र हे साखर उत्पादनात देशात दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. महाराष्ट्रात यंदाचा गाळप हंगाम सुरू होण्यास विलंब झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू हंगामात 51 टक्‍क्‍यांनी साखर उत्पादन कमी झाले आहे. महाराष्ट्रात यंदा 77 सहकारी व 66 खाजगी मिळून 143 कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. त्यामध्ये 34.64 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. मागील हंगामात या काळात महाराष्ट्रात 70.99 लाख टन साखर उत्पादन झाले होते. राज्यात तीन कारखान्यांचा गाळप बंद झाले आहे. 

याउलट, उत्तरप्रदेशात 119 कारखान्यात 54.96 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गतवर्षी तेथे या काळात 52.86 लाख टन साखर उत्पादन झाले होते. कर्नाटकात यंदा 17 टक्‍क्‍यांनी साखर उत्पादनात घट झाली असून तेथे 27.94 लाख टन उत्पादन झाले आहे. गतवर्षी तेथे या काळात 33.76 लाख टन साखर तयार झाली होती. गुजरात व तामिळनाडूत यंदा साखर उत्पादनात अनुक्रमे 27 व 28 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. गुजरातमध्ये 4.87 लाख टन तर तामिळनाडूत 2.05 लाख टन साखर तयार झाली आहे. आंध्रप्रदेश, बिहार, हरियाणा, मध्यप्रदेश, पंजाब, तेलंगणा या राज्यात मिळून 16.55 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Supply: स्वयंपाकाच्या गॅसवर केंद्राचा मोठा निर्णय! २१ कंपन्यांसाठी LPG उत्पादनाचा कोटा निश्चित; केंद्राची नवी रणनीती

Nagpur Police Endlife: नागपूरमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकाची साडीने गळफास घेऊन जीवन संपविले; पोलिस दलात खळबळ, कारणांचा तपास सुरू

Marathi News Live Updates : दिल्लीत २५ 'अटल कॅन्टीन्स'चे उद्घाटन; ५ रुपयांत मिळणार जेवण

Golden Pyramid of Fat Loss: फॅट लॉससाठी तज्ज्ञ का फॉलो करायला सांगतात ‘गोल्डन पिरॅमिड’ फॉर्म्युला? वजन कमी करण्याचा योग्य क्रम जाणून घ्या!

Amit Shah: सोनिया गांधींच्या 'त्या' कृतीवर अमित शाह संतापले! चित्तोडगडमधून साधला निशाणा; म्हणाले, देशाची माफी मागा...

SCROLL FOR NEXT