keli.jpg 
सोलापूर

ऊस व केळीचे पीक जोमात, मात्र काढणीसाठी कामगार येण्याची चिंता,कोठे? ते वाचा

राजाराम माने

केतूर(सोलापूर)ः तालुक्‍यातील उजनी धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लागवड झालेला ऊस व केळीचे पिक जोमदार आले आहे. केळीचे पीक दोनच महिन्यात काढणीला येणार आहे. या दोन्ही पिकांच्या काढणीच्या कामासाठी कोरोना संसर्गाने मजूर मिळण्याचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे शेतकऱ्यासोबत मजूर कंत्राटदार व वाहतुकदार देखील चिंतेत सापडले आहेत. 

करमाळा तालुक्‍यातील उजनी बॅकवॉटरच्या क्षेत्रात वाशिंबे, केतूर, उमरड, सोगाव, कंदर, वांगी हा भाग ऊस आणि केळी पिकाचे आगार म्हणून ओळखले जाऊ लागला आहे. परंतु कोरोना रोगाच्या वाढत्या संसर्गामुळे व लॉकडाउनने या भागातील शेतकरी पूर्ण हवालदिल झाला झाला आहे. एकीकडे ऊस पिकाला बगल म्हणून शेतकरी केळी सारख्या नगदी पिकाकडे वळला होता. सध्या केळीचे पीक हे दोन महिन्यात परीपक्वतेला येत आहे परंतु पुढील होणाऱ्या या रोगाच्या परिणामामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रकारची अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

तसेच या भागात ऊसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मागील वर्षी उजनी धरणातील पाणीसाठा आणि यावर्षी योग्य वेळेला आलेला पाऊस यामुळे उस हे पिक जोमात आहे. उसाला चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा उस उत्पादकांना आहे. परंतु कोरोना रोगामुळे ऊस तोडणी कामगार अडचण असल्याने एक प्रकारची चिंता या भागातील शेतकऱ्यांच्या व ऊस वाहतूकदाराच्या मनामध्ये सतावत आहे. 

तोडणी कामगार कामावर येण्याची चिंता 
ऊस तोडणी कामगारांना आम्ही पैसे दिले आहेत. परंतु ज्या भागातील मजुर या कामासाठी येतात त्याच भागात कोरोनाचा रोगांचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे मनात चिंतेचे वातावरण आहे. 
- सुभाष मोहन झोळ,वाशिंबे ऊस वाहतुकदार.

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Charge: UPI पेमेंटवर चार्ज लागू झाला तरी हे 6 UPI व्यवहार फ्री! एक रुपयाही चार्ज नाही; जाणून घ्या कोणते

IND vs PAK Asian Games : श्रेयस अय्यरचा संघ आशियाई स्पर्धेत पाकिस्तानला भिडणार? जाणून घ्या हा महामुकाबला केव्हा होणार

iPhone 18 Pro साठी पहाटेपासून ग्राहकांच्या लांब रांगा; कुठे मिळतो? किती EMI भरावा लागणार? जाणून घ्या

Marathi News Live Updates : शिरूरच्या आंबेडकर नगरमध्ये गोळीबार; दुचाकीवरून जात असलेल्या तरुणावर झाडल्या गोळ्या

Goat Farming Subsidy: शेळीपालनासाठी ६.८४ लाखांचे अनुदान; १०० शेळ्या, ५ बोकडांचा फार्म उभारण्याची संधी, कसा करायचा अर्ज?

SCROLL FOR NEXT