Utopian 
सोलापूर

उसाच्या फडात जाऊन "युटोपियन'ने दिली ऊसतोडणी कामगारांना दिवाळी भेट ! 

बिराप्पा करे

पाठखळ (सोलापूर) : शेकडो किलोमीटर दूरवरून आलेल्या ऊस तोडणी कामगारांची ही दिवाळी गोड व्हावी, या हेतूने कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून ऊसतोडणी कामगारांना उसाच्या फडात जाऊन दिवाळी साहित्याचे तसेच कोरोनासारख्या रोगापासून सुरक्षितता व्हावी म्हणून सॅनिटायझरचेही वाटप ऋषीकेश उमेश परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. 

या वेळी पंचायत समिती सभापती दिलीप घाडगे, युटोपियन शुगर्सचे मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे यांच्यासह ऊस तोडणी कामगार उपस्थित होते. ऊस तोडणी कामगार हे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या घरापासून, आपल्या नातलगांपासून शेकडो किलोमीटर दूर अंतरावरून येतात. पहाटेपासून कडाक्‍याच्या थंडीमध्येही उसाच्या फडामध्ये जाऊन ऊस तोडणीचे काम करीत असतात. असे ऊसतोड कामगार व त्यांचे कुटुंबीय दिवाळी सणापासून वंचित राहू नयेत याकरिता युटोपियन शुगर्सच्या वतीने ऊस तोडणी कामगारांना उसाच्या फडामध्ये जाऊन दिवाळी सणाकरिता आवश्‍यक असणारे सुगंधी तेल, साखर, उटणे, रवा, मैदा, खाद्यतेल, साबण, बेसन आदी प्रकारचे साहित्य व सध्याच्या कोव्हिड-19 या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या वातावरणामध्ये खबरदारीचा उपाय म्हणून युटोपियन शुगर्सने उत्पादित केलेल्या को-गो हॅंड सॅनिटायझर व मास्कचे मोफत वाटप कारखान्याच्या वतीने ऋषीकेश परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. 

या मिळालेल्या भेटीबाबत ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदार पांडुरंग हाके म्हणाले, युटोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक आणि शेती अधिकारी धनंजय व्यवहारे यांच्या संकल्पनेतून राज्यात प्रथमच ऊस तोडणी मजुरांना दिवाळी सणासाठी लागणारे साहित्य मोफत भेट दिले आहे. कारखान्याकडे आलेल्या सुमारे चार हजार मजुरांना विविध वस्तू भेट देऊन गरीब ऊस तोडणी मजुरांची दिवाळी गोड केली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhule Wedding Two Killed News : लग्नसमारंभावेळी अचानक चाकू हल्ला दोघांचा मृत्यू, ३ जण गंभीर; व्हॉट्सअ‍ॅपवर आक्षेपार्ह मेसेज ठेवल्याचा प्रकार

IND vs PAK: 'आम्ही किमान भारताला वर्ल्ड कपमध्ये हरवलंय, आमच्या माजी खेळाडूंनी तेवढंही...', शाहिद आफ्रिदी, युसूफला घरचा आहेर

Latest Marathi News Live Update : नंदुरबारमध्ये 87 ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

Abhishek Sharma: शून्य, शून्य, शून्य... 'सुपर ८' पूर्वी अभिषेकला मिळाला सुनील गावस्करांचा सल्ला; म्हणाले, ४ डॉट बॉल खेळले तरी चालेल...

नवऱ्याच्या हातात पोरीला देत आलिया भट्ट सासूसोबत करत होती गॉसिप, Viral Video पाहून नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT