The sugarcane season is over, now the workers are worried about Of employment 
सोलापूर

ऊस गाळप हंगाम संपला, आता मजुरांना चिंता रोजगाराची

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (जि. सोलापूर) : दुष्काळामुळे तालुक्‍यातील चारही साखर कारखान्यांचे यंदाचे गाळप लवकरच आटोपले आहे. कारखान्याच्या गाळप हंगामाच्या समाप्तीमुळे त्यावर अवलंबून असणाऱ्या मजुरांना पर्यायी रोजगार शोधण्याची वेळ आली आहे. 

गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे तालुक्‍यातील बहुतांश ऊस जनावराला चारा म्हणून वापरला गेला. याचा परिणाम साखर कारखान्याच्या गाळपावर झाला. तालुक्‍यामध्ये श्री संत दामाजी, भैरवनाथ, फेबटॅक आणि युटोपियन या साखर कारखान्याने यंदा हंगाम उशीरा सुरू करून लवकरच हंगाम संपवण्यात आला. त्यामुळे कारखान्याच्या साखर उत्पादनावर देखील परिणाम झाला. यंदा कारखानदारी कारखानदारांना तोट्यात चालवावी लागली. अशा परिस्थितीत या कारखानदारीवर अवलंबून असलेल्या ऊसतोड मजुरांना आता रोजगार नसल्यामुळे त्यांना पर्यायी रोजगार शोधण्याची वेळ आली. परंतु तालुक्‍यामध्ये सध्या कोणताही पर्याय रोजगार नसल्यामुळे रोजगार हमीच्या कामाशिवाय दुसरा कोणताही आधार नाही. सध्या तालुक्‍यांमध्ये ज्वारीच्या काढणीचा हंगाम सुरु असल्याने थोडे दिवस रोजगार उपलब्ध होऊ शकतो. 

परंतु एप्रिल-मेमध्ये मात्र मजुरांना रोजगारासाठी कसरत करावी लागणार आहे. त्यादृष्टीने रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु, सध्या तालुक्‍यामध्ये मजुरांना काम देण्याच्या दृष्टीने कोणतेही नियोजन प्रशासनाकडे नाही. भैरवनाथ व इतर दोन खासगी कारखान्याचे हंगाम यापूर्वीच बंद झाले आहेत. युटोपियन कारखान्याचा गाळप हंगाम आज समाप्त होत आहे. तर दामाजी आणखीन आठवडाभर चालेल अशी परिस्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

Kalyan Kale: ‘राहुल गांधींवर टीका करण्याची फडणवीसांची उंची नाही’; खासदार कल्याण काळेंचा मुख्यमंत्र्यांना पलटवार

Pune News: नव्या घराचे स्वप्न अधुरेच राहिले; बांधकामाला पाणी मारताना कैलास बेनके यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT