crime sakal
सोलापूर

विवाहीत स्त्री -पुरूषाची गळफास घेऊन लॉजच्या बंदखोलीत आत्महत्या

आत्महत्तेला जुण्याप्रेमाचा वास नागरिकांची कुजबुज

चंद्रकांत देवकते

मोहोळ : विवाहीत स्त्री -पुरूषाने एका  हॉटेल मधील बंद खोलीमध्ये  अज्ञात कारणाने छतावरील पंख्याला दोरी व ओढणीच्या साह्याने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील अर्जुनेसोंड येथे घडली.

याबाबत पोलीसाकडुन मिळालेल्या माहितीनुसार लांबोटी गावाच्या हद्दीत सोलापुर -पुणे हायवेवर दिनेश रामचंद्र गाडे रा .मोहोळ यांच्या मालकीचा रॉयल - इन - वन रेस्टारंट, लॉजीग, परमीटरुमचा व्यवसाय आहे. ता.27 सप्टेंबर सायकांळी साडेसहाच्या सुमारास अश्विनी बिराप्पा पुजारी, रा.धनजंय बाळु गायकवाड रा.लोणीकंद ता हावेली, जि. पुणे (आधार कार्डवरील माहिती वरून) यांनी आम्ही दोघेजन हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहोत असे सांगितल्याने त्यांच्याकडून मी ओळखपत्र घेवून खोली भाडयाने दिली. यावेळी त्यांनी रुममध्ये जाताना रात्री 10.00 वाजता आम्हाला जेवन पाठवा असे सांगितल्याानंतर हॉटेल कामगार माधव दत्तात्रय सोनसाळे याने खोली उघडून दिली.

दोघांनी सांगितल्याप्रमाणे रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास हॉटेल कामगार माधव दत्तात्रय सोनसाळे हा जेवनाचे आर्डर घेणे करिता खोलीजवळ जाऊन बाहेरची बेल वाजवली असता आतून कोणतेही प्रतिक्रिया आली नाही. म्हणून त्याने रूमच्या खिडकीतून आत मध्ये पाहिले असता धनंजय बाळू गायकवाड व त्याच्या सोबत अश्विनी बिराप्पा पुजारी गळफास घेतल्याचे दिसल्याने सोनसाळे याने हॉटेल कॉऊन्टरला येवून मला (हॉटेल मालक) यांना सदर घटना सांगितली. त्यावेळी मी स्वत: व माझा जोडीदार वैभव बाळासाहेब कदम असे दोघेजण मिळून सदर खोली जवळ जावून पाहिले तर आतून कडी लावलेली होती. त्यावेळी आम्ही खिडकीतून पाहिले असता धनंजय बाळू गायकवाड व त्याच्या सोबत असलेली अश्विनी बिराप्पा पुजारी असे दोघेजन गळफास घेतलेले अवस्थेत दिसून आल्याने लगेच आम्ही मोहोळ पोलीस स्टेशन येथे येवून सर्व हकिकत सांगितली.

मोहोळ पोलिसांनी घटनास्थळी येवून रूमचा दरवाजा तोडून सदर दोघांना पाहिले आसता अश्विनी पुजारी हिने दोरीच्या साह्याने तर धनंजय गायकवाड याने ओढणीच्या साह्याने गळपास घेतल्याचे दिसून आले. यावेळी अश्विनी हिच्या गळ्याची दोरी तुटल्याने ती खाली पडली होती. तर धनंजय हा तसाच लटकलेला होता व त्याचे दोन्ही पाय अश्विनीच्या शरीराला स्पर्श झाले होते, अशी खबर हॉटेेल रॉयल - इन चे मालक अनिल गाडे यांनी पोलिसांना दिली आहे.

अश्विनी पुजारी व धनंजय गायकवाड हे दोघेही विवाहीत असुन त्यांना अपत्य असल्याचे समजते. दोघांचाही आपआपल्या घरी सुखी संसार सुरू होता. एकंदरीत अज्ञात कारणाने जरी दोघांनी एकत्र येत गळफास घेतला असेल तरी ज्या विशिष्ठ पध्दतीने सिनेमातील एखाद्या प्रेमकथेला शोभेल अशा पध्दतीने अंतीम क्षणीही एकमेकांची जवळीक कायम राहील अशा पध्दतीने गळफास घेतला आहे. त्यावरून प्रेमाच्या नात्याच्या संबधातुनच ही दुर्घटना झाली असावी अशी चर्चा उपस्थित नागरिकांतुन सुरू होती .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT