सोलापूर

धक्कादायक ! प्रेमसंबंध नातेवाइकांना समजेल या भीतिपोटी नरखेड येथे प्रेमी युगुलाची आत्महत्या 

राजकुमार शहा

मोहोळ (सोलापूर) : प्रेमसंबंध घरातील व नातेवाइकांना समजेल या भीतिपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड (ता. मोहोळ) येथे गुरुवारी (ता. 17) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. 

आत्महत्या केलेल्या प्रेमीचे नाव प्रशांत रवींद्र शिंदे (वय 19) आहे तर तिची प्रेमिका ही अल्पवयीन आहे. मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत व अल्पवयीन मुलीचे प्रेमसंबंध होते. मात्र हे प्रेमसंबंध घरातील नातेवाइकांना समजले तर अडचणीचे होईल, या भीतीने ते दोघे बुधवारी (ता. 16) रात्री नऊ वाजता घरातून निघून गेले होते. त्या दोघांनी गावातीलच बाळासाहेब शंकर पाटील यांच्या शेतातील बांधावरील लिंबाच्या झाडाला एकाने ओढणीने तर दुसऱ्याने दोरीने गळफास घेतला. 

आत्महत्या केलेली अल्पवयीन मुलगी ही नरखेड येथील विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होती तर प्रशांत हा अकरावीच्या वर्गात शिकत होता. दरम्यान, दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता नातेवाइकांनी एकच हंबरडा फोडला. या वेळी रुग्णालय परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेची माहिती पोलिस पाटील अरुण पाटील यांनी दिली असून, तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष इंगळे हे करत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT