India Post esakal
सोलापूर

सोलापूर : पोस्टाच्या गुंतवणुकीत सुकन्या योजना अग्रस्थानी

ग्राहकांना गुंतवणुकीच्या इतर पर्यायाच्या तुलनेत उत्कृष्ट परतावे व व्याजदर देण्याचा प्रयत्न या योजनातून केला जातो.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : संपत्या वर्षात पोस्ट खाते व पोस्ट पेमेंट बॅंकेने जोरदार कामगिरी करत गुंतवणुकीचा आकडा वाढवला आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातदेखील पोस्ट गुंतवणुकीचा टक्का वाढत चालला आहे. सुकन्या योजना व विमा योजनात सर्वाधिक गुंतवणूक झाली आहे. ग्राहकांना गुंतवणुकीच्या इतर पर्यायाच्या तुलनेत उत्कृष्ट परतावे व व्याजदर देण्याचा प्रयत्न या योजनातून केला जातो. सरत्या वर्षात पोस्टाच्या अनेक योजनांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पंतप्रधान सुकन्या योजनेत मुलींच्या नावाने गुंतवणूक मोठ्या प्रमाणात केली जात आहे. आतापर्यंत सात हजार मुलींसाठी त्यांच्या पालकांनी या योजनेत गुंतवणूक केली आहे.

पोस्ट पेमेंटस बॅंकेच्या वतीने म्युचुअल फंड योजनेत पेन्शन प्लॉनची गुंतवणूक चांगल्या पध्दतीने केली जात आहे. या योजनांमध्ये चांगला परतावा मिळतो आहे. कोरोना काळात ‘पीएलआय’सारख्या विमा योजनांनी ग्रामीण भागात खूप अधिक चांगली कामगिरी केली आहे. या योजनेत कोणताही एजंट नसल्याने मध्यस्थाचे लाभ थेट ग्राहकांना मिळतात. पोस्टाने दोन विमा योजनांमध्ये चांगली गुंतवणूक करुन घेतली आहे. कोरोना काळात मयत झालेल्या व्यक्तीच्या वारसाला त्याचा लाभ देण्यात आला आहे. ‘एलआयसी’सारख्या विमा कंपनीसोबत पोस्टाच्या या योजना जोरदार स्पर्धा करत आहेत. नव्या वर्षात पोस्टाची गुंतवणूक निश्‍चितपणे आणखी वाढणार आहे.

ग्रामीण पोस्टल विमा योजना (महिनानिहाय संरक्षित विमा रक्कम)

  1. एप्रिल - ५० लाख ७० हजार रुपये.

  2. मे - ५१ लाख रुपये

  3. जून - ६० लाख २५ हजार रुपये

  4. जुलै - १ कोटी २५ लाख ४० हजार रुपये

  5. ऑगस्ट - ५ कोटी ३ लाख ९० हजार रुपये

  6. सप्टेंबर -५ कोटी ६३ लाख ४० हजार रुपये

  7. ऑक्‍टोबर - १० कोटी ८५ लाख ५० हजार रुपये

  8. नोव्हेंबर -३ कोटी ४६ लाख १५ हजार रुपये

पीएलआय योजना एप्रिल :

  1. मे - ३ कोटी ३० लाख रुपये

  2. जून - ३ कोटी ११लाख रुपये

  3. जुलै - ३ कोटी ७६ लाख ५०हजार रुपये

  4. ऑगस्ट - ७ कोटी पाच लाख ७० हजार रुपये

  5. सप्टेंबर - ८ कोटी ६६ लाख ७०हजार रुपये.

  6. ऑक्‍टोबर - १० कोटी ८२ लाख ९० हजार रुपये

  7. नोव्हेंबर - ६ कोटी १६ लाख ९० हजार रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Government Land: पुणे जिल्ह्यात शासकीय जमिनींचा शर्तभंग; ३३० प्रकरणे उघड, ३५० कोटींच्या ३० ते ४० जागा शासनजमा

1980s चा ट्रेंड फॉलो केला... पण तेव्हाचा हा वादळी राजकीय किस्सा वाचा... सत्ता, पराभव, जेल अन् इंदिरा गांधींचं कमबॅक

Maharashtra Cooperative Bank: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ठेवींना मोठा फटका; वर्षभरात ६,३५० कोटींची घट, एनपीए ८.४४ टक्क्यांवर

US Open: झ्वेरेव सलग चौथ्यांदा ग्रँडस्लॅमच्या सेमीफायनलमध्ये; फायनलच्या तिकिटासाठी कोणाविरुद्ध होणार लढती?

Engineering Student: आजी, मम्मी, पप्पा... सॉरी!’ अभियांत्रिकीच्या २२ वर्षीय विद्यार्थ्याने संपवले जीवन; ‘छोटीला चांगले शिकवा...’ अशी चिठ्ठी

SCROLL FOR NEXT