pdr_satpute 
सोलापूर

माघी एकादशी दिवशी मंदिर परिसरात संचारबंदी ! जिल्हा, तालुका व शहर हद्द अशी असणार त्रिस्तरीय नाकाबंदी

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी आणि कार्तिकी यात्रेप्रमाणे येणारी माघी यात्रा देखील प्रातिनिधिक आणि मर्यादित स्वरूपात पार पडावी यासाठी नियोजन करण्यात येत आहे. माघी एकादशी दिवशी एक दिवस श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर परिसरात संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

तेजस्वी सातपुते म्हणाल्या, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी आणि कार्तिकी यात्रा प्रातिनिधिक स्वरूपात साजरी झाली. त्याच पद्धतीने येणारी माघी यात्रा पार पाडली तर कोरोनाचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे. श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर समितीने 22 व 23 फेब्रुवारी असे दोन दिवस भाविकांसाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रांताधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे माघी यात्रा काळात संचारबंदी लागू करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवलेला आहे. आमच्याकडेही तो प्रस्ताव आला आहे. त्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव देणार आहोत. यात्रेच्या वेळी पंढरपुरात गर्दी होऊ नये यासाठी सोलापूर जिल्हा बॉर्डर, तालुका आणि शहराच्या हद्दीवर अशा पद्धतीने त्रिस्तरीय नाकाबंदी केली जाणार आहे. 

माघी यात्रेसाठी राज्याच्या विविध भागांतून भाविक येत असतात. सध्या सोलापूर जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असला तरीही यात्रेमुळे हजारोंच्या संख्येने लोक एकत्र आल्यास कोरोना वाढीचा धोका आहे. हे लक्षात घेऊन आवश्‍यक दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी कोणीही भाविकांनी माघी यात्राकाळात पंढरपुरात येऊन गर्दी करू नये. स्थानिक नागरिकांनी देखील यात्रेच्या काळात अनावश्‍यक घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले. या प्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम उपस्थित होते. 

पंढरपूरकडे विशेष लक्ष 
पंढरपूर शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या संदर्भातील सुमारे पाच कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळून येत्या आषाढी यात्रेपूर्वी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित व्हावी यादृष्टीने पाठपुरावा करण्यात येत आहे. पंढरपूर हे जिल्ह्यातील महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे पंढरपूरकडे आपले विशेष लक्ष आहे. शहर व तालुक्‍यातील गुन्हेगारी, अवैध व्यवसाय, वाळू उपसा, वाहतूक समस्या या सर्व बाबतीत पोलिसांकडून कडक कारवाई केली जाईल. गुन्हेगारांशी पोलिस अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांचे संबंध असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर देखील कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! एप्रिलमध्ये ‘या’ महिलांनाच मिळणार ३००० रुपये, ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिलांचा बंद होणार लाभ, वाचा...

उज्ज्वला योजनेच्या महिलांच्या डोळ्यात धूर! ऑनलाइन बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट; अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय, पण अंमलबजावणी कागदावरच, वाचा...

Paneer Jowar Paratha: उन्हाळ्यात हलका पण पौष्टिक नाश्ता हवा असेल तर घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पनीर ज्वारी पराठा

अग्रलेख : भारत- चीन व्यापाराचा नवा अध्याय

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १४ मार्च २०२६ ते २० मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT