स्मशानभूमी,अभ्यासात एकाग्रता sakal
सोलापूर

Solapur : स्मशानभूमीतील शांततेमुळे अभ्यासात एकाग्रता

सोलापूरचे आराध्य दैवत रुपाभवानी मंदिरा जवळील लिंगायत स्मशान भूमी ही शहरातील इतर स्मशानभूमीपेक्षा सोयीसुविधांनी युक्त आहेअंधश्रद्धा अन्‌ मनातील भीतीला बगल,वैकुंठभूमीत विद्यार्थी पाहताहेत भवितव्याचे स्वप्न

सचिन गायकवाड

सोलापूर- परीक्षा जवळ आली की विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी आपल्याला आवडेल असे ठिकाण निवडतात. काही विद्यार्थी शाळा, महाविद्यालयातील अभ्यासिका, वाचनालये तर काही विद्यार्थी बगीचा व उद्याने येथे अभ्यास करतात. परंतु, काही विद्यार्थी अंधश्रद्धेला व मनातील भीतीला थारा न देता अभ्यास करण्यासाठी स्मशानातील शांततेला प्राधान्य देत आहेत.

सोलापूरचे आराध्य दैवत रुपाभवानी मंदिरा जवळील लिंगायत स्मशान भूमी ही शहरातील इतर स्मशानभूमीपेक्षा सोयीसुविधांनी युक्त आहे. येथील व्यवस्थापनाने स्मशानभूमीत वेगवेगळ्या प्रकारची झाडे लाऊन नियोजनबद्ध विकास केलेला आहे.

या झाडांच्या सावलीत व अंत्यसंस्कारासाठी आलेल्या माणसांना बसण्यासाठी बनविलेल्या शेडखाली विद्यार्थी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अभ्यासात मग्न झाल्याचे पाहायला मिळते. येथे पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध आहे. याचाही फायदा विद्यार्थ्यांना वेळेची बचत करण्यासाठी होतो. या स्मशानभूमीच्या जवळच काही नामवंत महाविद्यालये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? केंद्र सरकारने विंडफॉल कराच्या दरात केली मोठी वाढ

सोलापूर पोलिस आयुक्तांचे आदेश! सोलापूर शहरात डीजे अन्‌ लेझर लाईट्सवर बंदी; उल्लंघन करणाऱ्यांवर होणार 'बीएनएस' २०२३ मधील कलम १६३ नुसार कारवाई, वाचा...

Prashant Kishor: बंगला बदलल्याने नशीब बदललं? प्रशांत किशोर यांनी भाजपचा 30 वर्षांचा गड कसा केला उद्ध्वस्त?

नुसतं राहायचं ठिकाण नाही, सलमान खानच्या १५० एकरात असलेल्या फार्महाउसवर होते शेती; काय काय पिकतं माहितीये?

पोलिस अधीक्षक म्हणाले..! आता अडचणीत पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशामकची मदत एकाच कॉलवर; महिला, विद्यार्थी व एकट्याने प्रवास करणाऱ्यांसाठी ‘हे’ ॲप, वाचा...

SCROLL FOR NEXT